Home > News Update > "मी एक सिंह तुम्ही सर्व गिधाडे" एकनाथ खडेसेंचा टोला कुणाला?

"मी एक सिंह तुम्ही सर्व गिधाडे" एकनाथ खडेसेंचा टोला कुणाला?

एकनाथ खडसे आणि भाजप यांच्यातील वाद खुप जुना आहे. एकनाथ खडसे यांनी विभक्त जाती-जमाती मेळाव्यात भाजपवरती टीका केली. "मी एक सिंह बाकी सर्व गिधाडे" राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे असे का म्हणाले

मी एक सिंह तुम्ही सर्व गिधाडे एकनाथ खडेसेंचा टोला कुणाला?
X

राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी विभक्त जाती-जमाती मेळाव्यात भाजपवरती टीकास्त्र सोडताना पाहायाला मिळाले. खडसे आणि भाजप यांच्यातील वाद जुना आहे. परंतू एकनाथ खडसे यांनी जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीन भटक्या विभक्त जाती-जमाती विभागामार्फत मेळावा घेऊन "मी एक सिंह आहे, तुम्ही सर्व गिधाडं आहात" अशी भाजपवरती टीका केली. "जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खडसे यांची पत्नी मंदा खडसे विरुद्ध राज्यातील दोन मंत्री भाजप आणि शिंदे गटातील आमदार खासदार एका महिलेला दोषी ठरवण्यासाठी एकत्र आले होते." अशी आपल्या भाषेतून खडसे यांनी आठवण करुन दिली. "मी सिंहासारखा बसून असल्याने ही गिधाड एकत्र आले आहेत. . मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे कितीही एकत्र आले तरी मी सर्वाना पुरून उरेल" असे चँलेज खडसे यांनी भाजपाला केले आहे.

तसेच मेळाव्यात आपल्या भाषणातून शिंदे-फडणवीस यांच्यावरती देखील टीका केली येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीतील दाखला देत "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुहाटिला ४० आमदारांना घेऊन जाणार आहेत हा मुद्दा पकडत पुन्हा काय तेच झाडी , डोंगार पाहायला जाणार" अशी खिल्ली खडसेंनी उडवली. "जामनेर मतदार संघ हा पहिला शिवसेनेचा होता. माझ्या सांगण्यावरुन शिवसेनेने हा मतदार संघ भाजपला दिला म्हणूनच गिरीश महाजन आमदार म्हणून निवडून आले. जामनेर मतदार संघ भाजपला मिळाला नसता तर आज गिरीश महाजन आमदार दिसले नसते." एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर भाजप नेते काय बोलणार हे देखील पाहणं तितकच महत्त्व ठरणार आहे.

Updated : 19 Nov 2022 6:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top