Home > मॅक्स रिपोर्ट > अविनाश भोसले इडीच्या रडारवर का आहेत?

अविनाश भोसले इडीच्या रडारवर का आहेत?

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंवर अंमलबजावणी संचलनालयाने ईडीने (ED) धाड टाकून चौकशी सुरु केली आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर ईडीने अविनाश भोसले यांचा मुलगा अमित याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी मुंबईत आणलं आहे. अविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या मुलीला म्हणजेच राज्याचे कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती आहे. मॅक्स महाराष्ट्रने हा रिपोर्ट प्रसिध्द केला होता CBI ने भोसलेंना अटक केले आहे...अविनाश भोसले का आहेत रडारवर?

अविनाश भोसले इडीच्या रडारवर का आहेत?
X

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंवर अंमलबजावणी संचलनालयाने ईडीने (ED) धाड टाकून चौकशी सुरु केली आहे. दिवसभराच्या (२१ जून) चौकशीनंतर ईडीने अविनाश भोसले यांचा मुलगा अमित याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी मुंबईत आणलं आहे. अविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या मुलीला म्हणजेच राज्याचे कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती आहे. मात्र, अविनाश भोसले नक्की कोण आहेत. त्यांच्यावर ही कारवाई का करण्यात येत आहे. हे जरा आज आपण जाणून घेऊया

एका रिक्षा चावलवणाऱ्या तरुणानं आज स्वतःच्या मालकीची तीन हेलिकॉप्टर विकत घेतली. सातत्यानं अविनाश भोसले हे नाव महाराष्ट्रात नेहमीच वादाचा केंद्रबिंदू ठरलयं. कृष्णा खोरेची जलसंपदा विभागातील कोट्यावधी रुपयांच्या कंत्राटं असो एअरपोर्टवरुन महागड्या वस्तू करचुकवेगीरी तर कधी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी असलेले संबध नेहमीच चर्चेचे विषय ठरलेत.

मागच्या आठवड्यात अविनाश भोसलेंची ईडीकडून 2007 सालच्या एका प्रकरणात तब्बल आठ तास चौकशी करण्यात आल्यान ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. संगमनेरच्या एका गावातून आलेल्या तरुणाचा रिक्षाचालक म्हणून सुरू झालेला अविनाश भोसले यांचा प्रवास स्वतःच्या मालकीची तीन हेलिकॉप्टर खरेदी पर्यंत झालाय. अविनाश भोसले यांचा जन्म संगमनेर येथे एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे संगमनेर येतील सावर्जनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते. त्यांना एक भाऊ- अभय आणि दोन बहिणी आहेत. अविनाश भोसले यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे मूळ तांबवेत या गावाचे (कराड,सातारा) येथील रहिवासी आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले तेव्हा सुरवात रिक्षाचालक म्हणुन केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरू करुन अल्पावधीत रिक्षा भाड्यानं देण्याचा व्यवसाय करु लागले. त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली आणि अविनाश भोसले रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेऊ लागले. पुढे त्यांच्या सासर्‍यांच्या माध्यमातून त्यांना अधिक मोठी काम मिळायला लागली.

पण अविनाश भोसले यांचं नशीब खऱ्या अर्थाने उघडलं ते 1995 ला राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग ओलिताखाली आणण्यासाठी युती सरकारकडून कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि या महामंडळाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या कामांना सुरुवात झाली.

तोपर्यंत जलसंपदा विभागातील काम करण्यासाठी आंध्र प्रदेशातील कंत्राटदारांची मक्तेदारी होती. अविनाश भोसले यांच्या या विभागातील प्रवेशानं एका मराठी कंत्राटदार पुढे आणला गेला. सर्व पक्षीय राजकीय पक्षातील नेत्यांची जवळीक साधण्याचं आणि पुढे ती संवर्धीत करण्याचं `कौशल्य` अविनाश भोसलेंनी विकसीत केलं मग त्यांची प्रगती सुसाट वेगानं सुरु झाली.

1999 ला महाराष्ट्रातलं शिवसेना- भाजपा युती सरकार जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार सत्तेत आलं. अविनाश भोसले यांनी त्यांच्या कौशल्यानं सरकार बदललं तरी राजकीय संबंध मात्र तोडले नाही. नव्या सत्ताधाऱ्यांशी देखील तेवढच जुळवून घेतलं आणि त्यांची आर्थिक घोडदौड कायम ठेवली. एका बाजूला महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प कोट्यावधी रुपयांचा खर्च केल्यानंतर रखडले होते. दुष्काळी महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालं नाही. पण दुसरीकडे अविनाश भोसले यांची भरभराट डोळे विस्फारणाऱ्या वेगाने झाली होती.

पुण्यातील बाणेर भागात अविनाश भोसले मी उभारलेलं व्हाईट हाऊस हे मध्यवर्ती केंद्र बनलं. या व्हाईट हाऊसच्या टेरेसवर अविनाश भोसलेंच्या मालकीच तीन हेलिकॉप्टर उभी राहिली. अवघ्या काही रिक्षा व्यवसाय ते स्वतःच्या मालकीची हेलिकॉप्टर इथपर्यंतचा अवघ्या काही वर्षांचा मध्ये झालेला अविनाश भोसले यांचा प्रवास सर्वांच्याच दृष्टीनं अचंबित करणारा होता.

अविनाश भोसलेंच्या वायुवेगाच्या प्रगतीला ब्रेक लागला तो 2007 चाली जेव्हा मुंबई एअरपोर्टवरती त्यांना कस्टमकडून अटक झाली. लंडनहून येताना आणलेल्या महागड्या वस्तू आणि परदेशी चलन अविनाश भोसलेंनी कस्टम ड्युटी चुकवुन एअरपोर्टच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. घात तिथेच झाला. पुढे या या प्रकरणात फारशी चौकशी झाली नाही आणि सर्वपक्षी आणि त्यांची असलेल्या संबंधांमुळे अविनाश भोसले यांचा प्रवास पुढे सुरुच ठेवला. जलसंपदा घोटाळ्याचे वादळ घोंगावू लागल्यानंतर अविनाश भोसलेंनी

जलसंपदा विभागातील ठेकेदारी कमी करून बांधकाम क्षेत्र, रस्ते आणि पूल उभारणी, हॉटेल व्यवसायात विस्तार वाढवला. पुण्यातील कोरेगाव पार्क भागात त्यांनी उभारलेल्या हॉटेलच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख , शरद पवार ,गोपीनाथ मुंडे, पतंगराव कदम आणि त्यावेळेचे देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक बडे नेते हजर होते.

अविनाश भोसले यांच्या या प्रवासात राजकीय नेत्यांची त्यांची असलेली जवळीक ही अनेकदा दिसून आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा अविनाश भोसले स्वतःची गाडी घेऊन बाळासाहेब ठाकरे यांचे सारथ्य करायचे. शिवाय बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वरला अनेकदा अविनाश भोसले यांच्या बंगल्या मध्ये मुक्कामाला देखील राहिले. उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारीची फोटोग्राफी करताना ज्या हेलिकॉप्टर चा उपयोग केला ते हेलिकॉप्टर देखील अविनाश भोसले यांच्या मालकीचं होतं आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाहावा विठ्ठल या त्यांच्या पुस्तकामध्ये अविनाश भोसले यांचे आभार देखील व्यक्त केलेत.

गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडेंच्या पुण्यातल्या शाही लग्न सोहळ्यावेळी अनेक पाहुणे हे अविनाश भोसले यांच्या पंचतारांकित हॉटेलमध्येच मुक्कामाला होते. एका रिक्षावाल्यानं पैशाच्या जोरावर एवढे राजकीय संबंध वाढवले कि ते वैयक्तीक नातेसंबधात परीवर्तीत झाले. अविनाश भोसले यांच्या मुलीचा विवाह काँग्रेस नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री विश्वजीत कदम यांच्याशी झालाय. जलसंपदा विभागातील वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांबाबत आणि त्यावरती करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाबाबत जेव्हा वादंग निर्माण झाला तेव्हा अविनाश भोसले यांनी जलसंपदा विभागातील कामं कमी करून इतर क्षेत्रांमध्ये उडी घेतली. आज पुण्यातील सर्वात उंच इमारती या त्यांच्या एबीआयएल या कंपनीने बांधल्यात. आज अविनाश भोसले यांच्या कंपनीची उलाढाल काही हजार कोटींमध्ये आहे.

अविनाश भोसले हे कॉंग्रेसचे, माजी वनमंत्री आणि भारती विद्यापीठाचे कुलपती पंतगराव कदम यांचे व्याही आहेत. भोसले यांची मुलगी स्वप्नाली भोसले हिचा विवाह कदम यांचा मुलगा विश्वजित कदम याच्याशी ०७ डिसेंबर २००७ रोजी झाला. त्यावेळी विश्वजित कदम हे महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. स्वप्नाली भोसले-कदम ही सुद्धा बांधकाम व्यवसायात उद्योजिका आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील, कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व पक्षातील बडे नेते लग्नाला हजर होते.

२०१७ मध्ये उद्योगपती व बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचे जावाई तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजिव विश्वजित यांच्या निवासस्थाने व कार्यालये यांच्यावर मुंबईतील प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी मुंबई व पुणे येथील 25 ठिकाणी एकाचवेळी हे छापे टाकले गेले होते. त्यात 200 अधिकारी सहभागी झाले होते. छाप्याप्रसंगी भोसले व कदम यांच्या कर्मचार्‍यांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले होते. तसेच, खासगी सुरक्षा रक्षकही हटविण्यात आले होते. सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. भोसले यांचे मुख्यालय असलेल्या एबिल ग्रुप, गणेशखिंडसह बाणेर येथील निवासस्थान आणि इतर कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने हा सत्तेचा दुरुपयोग चालविला असून, काँग्रेसच्या बदनामीचे हे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.

2017 साली इन्कमटॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते. यावेळी ईडीने अविनाश भोसले यांना 2007 साली त्यांच्यावरती कस्टम विभागाकडून ज्या फेमा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती त्या प्रकरणासंबंधी माहिती घेण्यासाठी चौकशीला बोलावल्याचा सांगण्यात आलंय. मात्र 2007 सालच्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावून अविनाश भोसलेंच्या माध्यमातून राज्य सरकारमधील बड्या नेत्यांवर दबाव टाकण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? अशी शंका राजकीय क्षेत्रात वर्तवली जातेय.

Updated : 26 May 2022 2:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top