Home > Election 2020 > शरद पवारांसोबत अजित पवार दिल्लीत कशासाठी?

शरद पवारांसोबत अजित पवार दिल्लीत कशासाठी?

शरद पवारांसोबत अजित पवार दिल्लीत कशासाठी?
X

आज शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या भेटी संदर्भात पत्रकारांना माहिती दिली. मात्र, या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार देखील उपस्थित होते.

अजित पवार दिल्लीत क्वचितच असतात. मात्र, आज झालेल्या शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते.

अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्ष नेते पदी निवड करण्यात आली आहे. त्यातच सध्या राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यातच शिवसेनेला आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी संसदीय कामकाजाचा कुठलाही अनुभव नाही.

या पार्श्वभूमीवर जर शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी संसदीय कामकाजाचा अनुभव येईपर्यंत मुख्यमंत्री पद घेतले नाही. आणि सुरुवातीला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे देण्याची वेळ आली तर ते नक्की कोणाला देण्यात येईल? याचा विचार केला असता. राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षाचे नेते असलेल्या अजित पवार यांनाच ते दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळं एरवी शरद पवार यांच्यासोबत दिल्लीत न दिसणारे अजित पवार आज दिल्लीत असल्याची शक्यता आहे.

दरम्यान सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला... यावेळी त्यांना शिवसेनेसोबत जाणार का? असा प्रश्न विचारला असता पवार यांनी..."शिवसेनेसोबत चर्चा नाकारता येत नाही. शिवसेनेकडून अद्याप विचारणा झालेली नाही. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारणा व्हायला हवी. आम्हाला कोणाकडूनही प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे पाठींबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,"

असं म्हणत शरद पवार यांनी शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले.

काय म्हणाले शरद पवार... ?

मी जे बघतोय त्यानुसार मला असं दिसतंय की शिवसेनेला त्यांच्या नेतृत्वात सरकार हवे आहे..

कुणी आम्हाला विचारलं तरी पाहिजे.

शिवसेना आणि भाजपमध्ये जे सुरू आहे ते 'केवल बार्गेनिंग गेम नाही, मुझे सिरीयस लगता है'

Updated : 4 Nov 2019 6:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top