Home > News Update > कोरोनाची लस कुणाला दिली जाणार नाही?

कोरोनाची लस कुणाला दिली जाणार नाही?

कोरोनावरील लसीकरण शनिवारपासून सुरू होत आहे. पण ही लस सध्या कुणाला दिली जाणार नाही याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

कोरोनाची लस कुणाला दिली जाणार नाही?
X

शनिवारपासून देशात कोरोना लस देण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. पण ही लस कुणाला दिली जाणार नाही हे देखील आरोग्यविभागातर्फे स्पष्ट करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) कोविडची लस गरोदर आणि स्तनदा माता यांना देता येणार नाही. गरोदर मातांच्या पोटातील बाळा लाकाही अपाय होऊ नये तसेच जन्मलेल्या बाळाला स्तनपान करतांना बाळावर काही रिऍक्शन होऊ नये म्हणून अशा मातांना सध्यातरी कोविड लस देता येणार नाही. यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.

HIV, हृदय , किडनी ट्रान्सप्लांट रुग्णांचे काय?

ज्या व्यक्तींचे हृदय, लिवर, किडनी ट्रान्सप्लांट झाले आहे त्यांनाही कोविडची लस देता येणार नाहीये. तसंच ज्या व्यक्तींची प्रतिकार क्षमता कमी आहे उदा. HIV रुग्ण, नेहमी रक्तस्राव होणाऱ्या व्यक्तींना कोविड लस देता येणार नाही. यासाठी कोविड लस देण्यापूर्वी त्या व्यक्तीची हेल्थहिस्ट्रीही तपासली जाणार आहे, अशी माहिती जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी दिली.


Suggested Video:


Updated : 15 Jan 2021 2:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top