Home > News Update > कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे पथक अखेर चीनमध्ये दाखल...

कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे पथक अखेर चीनमध्ये दाखल...

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांचे पथक चीन मध्ये गेले असून पथकात १० तज्ज्ञांचा समावेश आहे. या विषाणूचा उगम कसा झाला व तो जगभर कसा पसरला यासोबत अनेक गोष्टींचा शोध हे पथक घेणार आहे.

कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे पथक अखेर चीनमध्ये दाखल...
X

गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने साऱ्या जगास वेठीस धरले आहे. लाखो लोकांना यामध्ये आपले प्राण गमवावे लागले. कोरोनाचा संसर्ग वुहान शहरातून संपूर्ण चीनमध्ये आणि त्यानंतर संपूर्ण जगभर पसरला. या विषाणूची उत्पत्ती नक्की काशी झाली व जगभर तो कसा पसरला हे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांचे एक पथक आता चीन मध्ये गेले आहे. कोरोनाचे मूळ शोधण्यासोबत अनेक गोष्टींचा शोध हे पथक घेणार आहे.

पथकात १० तज्ज्ञांचा समावेश आहे. पथक सिंगापूरहून चीनमध्ये दाखल झाले. पण सध्या चीन मध्ये असलेल्या निर्देशानुसार या पथकास १४ दिवस आयसोलेशन मध्ये राहावं लागणार आहे. आयसोलेशनमध्ये असताना चीनचे तज्ज्ञ त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार असल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

चीनवर कोरोनाबाबत माहिती लपवल्याचा व गांभीर्य न दाखवता सगळ्या जगाला अंधारात ठेवल्याचा आरोप सातत्याने केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाला सुद्धा चीनने सुरवातीला प्रवेश नाकारला होता. पण नंतर व्हिसाच्या तांत्रिक बाबीमुळे हा प्रवेश देण्यास अडचणी असल्याचे चीनने सांगितले. आता सर्व बाबीचा हे पथक शोध घेणार आहे. नक्की हा विषाणू कसा निर्माण झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही.

याबाबत तज्ज्ञांची वेगवेळी मते आहेत. हा विषाणू प्राण्यांच्या मधून मानवी शरीरात आला की, हे संकट मानवनिर्मित आहे. यामध्ये व्यूहानच्या प्रयोगशाळेकडे देखील संशयाने पाहिले जाते. आतापर्यंत चीनने कोरोनवर नियंत्रण मिळवण्यात चांगलंच यश मिळवलं होत. सध्या जागतिक आरोग्य संघटनेचे पथक तिथे गेले आहे पण तिथे आता पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

Updated : 14 Jan 2021 10:26 AM GMT
Next Story
Share it
Top