Home > News Update > Mossad spy agency: च्या संचालक पदी पहिल्यांदाच महिलेची निवड

Mossad spy agency: च्या संचालक पदी पहिल्यांदाच महिलेची निवड

Mossad spy agency: च्या संचालक पदी पहिल्यांदाच महिलेची निवड
X

मोसादच्या संचालक पदी पहिल्यांदाच महिलेची निवड, कोण आहे जगातील सर्वात शक्तीशाली स्पाय एजन्सीची नवीन डायरेक्टर जाणून घ्या..

मोसाद च्या स्पाय (हेरगीरीच्या) एजन्सीच्या कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. त्या ऑपरेशनचे किस्से तुमच्या वाचनात आले असतील. आता जगातील पॉवरफुल हेरगीर संस्थेच्या संचालक पदी एका महिलेची नेमणूक करण्यात आली आहे.

इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने पहिल्यांदाच एका महिला संचालकाची नियुक्ती केली आहे. मोसादने या महिलेचं नाव अथवा कुठलीही माहिती दिलेली नाही. मात्र, जगातील गुप्तचर यंत्रणांपैकी अत्यंत प्रभावी गुप्तचर यंत्रणेच्या संचालक पदी पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती केली गेली आहे.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. ट्विटरवर दिलेल्या माहितीच्या नुसार सदर महिलेला 'ए' हा कोड दिला असून 'ए' या महिलेची संचालक पदी निवड करण्यात आल्याच इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर मंत्रालयाने या महिलेचा फोटो देखील ट्वीट केला असून तिचा चेहरा ब्लर केला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा प्रकारे सदर महिलेची ओळख लपवण्यात आल्याचं बोललं जात आहे.

टाईम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार, सदर महिला अधिकारी गेल्या 20 वर्षांपासून मोसादमध्ये काम करत असून या महिला अधिकाऱ्याचा अनेक मोठमोठ्या मोहिमांमध्ये सहभाग राहिलेला आहे. सदर महिलेची आता गुप्तचर विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, ए (कोड नेम) लवकरच जागतिक दहशतवाद आणि इराणचा आण्विक कार्यक्रम अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर जबाबदारी स्वीकारणार आहेत. यासोबतच मोसादची गुप्तचर माहिती गोळा करण्याची जबाबदारीही या महिला अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. यासोबतच एजन्सीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांभाळण्याचे कामही ए करणार आहे.

Updated : 20 Aug 2022 7:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top