Home > News Update > गुणरत्न सदावर्तेंना नागपुरहून फोन करणारा 'तो' कोण?

गुणरत्न सदावर्तेंना नागपुरहून फोन करणारा 'तो' कोण?

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (silver oak) या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यातच हल्ल्याच्या दिवशी सदावर्ते यांना नागपुरहून फोन आला होता, असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला. त्यामुळे सदावर्तेंना नागपुरहून फोन करणारा 'तो' कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.

गुणरत्न सदावर्तेंना नागपुरहून फोन करणारा तो कोण?
X

उच्च न्यायालयाने (High Court) दिलेल्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवास्थानी निदर्शने (ST worker Agitation) करत चपला फेकल्या. त्यामुळे राज्यभरात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. तर या हल्लाप्रकरणी एसटी 109 एसटी कामगारांसह एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna sadavarte arrest) यांना अटक करून दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज न्यायालयात युक्तीवाद करताना सरकारी वकील प्रदीप घरत (Special public prosecutor Pradip Gharat) यांनी सदावर्ते यांना हल्ल्याच्या दिवशी सकाळी नागपुरहून फोन आला होता, अशी माहिती न्यायालयात दिली. त्यामुळे सदावर्ते यांना नागपुरमधून फोन करणारा कोण? अशी चर्चा सुरू आहे.

काय घडलं कोर्टात (What happened in Court)

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी adv. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईच्या गिरगाव कोर्टात (Girgaon court) दाखल करण्यात आले. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने वकील गिरीश कुलकर्णी (Adv. Girish Kulkarni) यांनी तर सरकारी पक्षाची बाजू वकील प्रदीप घरत यांनी मांडली. यावेळी झालेल्या युक्तीवादात सरकारी पक्षाच्या वतीने युक्तीवाद करताना प्रदीप घरत म्हणाले की, प्रथमदर्शनी सदावर्ते यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे दिसून येत आहे. तसेच सदावर्ते यांची चौकशी केली असता या प्रकरणात आणखी चार जणांचा सहभाग आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सदावर्ते यांना पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. (Police demand to court police custody of Gunratna sadavarte)

यावेळी युक्तीवाद करताना प्रदीप घरत म्हणाले, सदावर्ते हे स्वतः वकील आहे. तसेच हे प्रकरण घडले तेव्हा सदावर्ते हे मॅट कोर्टात हजर होते. मात्र हल्ला झालेल्या दिवशी सदावर्ते हे सकाळी 8.33 पासून मीडियाच्या संपर्कात होते. त्यांनी आपल्या योजनेची माहिती मीडियाला दिली. त्यामुळे या दिवशी सदावर्ते यांनी नागपुरला एक कॉल केला होता. तो कॉल कुणाचा होता? त्याचा तपास करायचा आहे. त्यामुळे सदावर्ते यांना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली.

पोलिसांनी कोर्टात काय सांगितले? (What the police said in court)

पोलिसांनी केलेल्या तपासानंतर सांगण्यात आले की, हल्ल्याआधी सदावर्ते यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत सिल्वर ओकवर हल्ला करायचे ठरले होते. या बैठकीदरम्यान अभिषेक पाटील हा एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्यानेच फोन करून पत्रकारांना बोलावले होते. त्यामध्ये काही युट्यूब चॅनलचे पत्रकारदेखील होते. याबरोबरच या प्रकरणात चार जणांचा ताबा आवश्यक होता. मात्र त्यापैकी एकजण फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

नागपुरहून आलेला फोन कुणाचा?

शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सदावर्ते यांना नागपुहून फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र नागपुरहून आलेला तो फोन कुणाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे. परंतू आरोपी याबाबत कसलीही माहिती द्यायला तयार नसल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात सांगितले. तसेच घटनेच्या दिवशी दुपारी 1.38 वा. ज्या नंबरवरून कॉल आला होता. त्याच नंबरवरून पुन्हा एकदा कॉल आला आणि पत्रकार पाठवा असे सांगितले. तर 2.42 मिनिटांनी सर्व पत्रकारांना निरोप देण्यात आला. त्यामुळे हा सुनियोजित कट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सदावर्ते यांना पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.

सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांचा युक्तीवाद-

सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी युक्तीवाद करताना म्हटले आहे की, शरद पवारांच्या घरावर करण्यात आलेल्या आंदोलनात कोण लोक होते हे सर्वांना माहिती आहे. तसेच हा हल्ला होणार अशी माहिती असतानाही पोलिस बंदोबस्त का नव्हता? तसेच शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करणे याला कट म्हणता येणार नाही. कारण हे आंदोलन एक वर्षापासून सुरू आहे. याबरोबरच शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या धक्काबुक्कीत कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच MJT चे संपादक चंद्रकांत सुर्यवंशी यांनी सर्व पत्रकारांना माहिती दिल्याचा युक्तीवाद सदावर्ते यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी केला.

Updated : 11 April 2022 1:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top