Home > News Update > इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेले इब्राहिम रईसी नक्की कोण आहेत?

इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेले इब्राहिम रईसी नक्की कोण आहेत?

इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेले इब्राहिम रईसी नक्की कोण आहेत?
X

कट्टरपंथी इब्राहिम रईसी यांची इराणच्या राष्ट्रपती पदी निवड करण्यात आली आहे. 60 वर्षीय रईसी हे ऑगस्टमध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष हसन रूहानी यांची जागा घेतील. इब्राहिम रईसी हे एक वकील आहेत. त्यांनी अनेक वर्ष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. who is Ebrahim raisi

इराणमध्ये हे सत्ता परिवर्तन अशा वेळेस होत आहे. जेव्हा अमेरिका आणि इतर युरोपियन देशांशी अणुकराराबाबत चर्चा सुरू आहे. इराणला पुन्हा अणुकरारामध्ये सहभागी व्हायचं आहे. मात्र, त्यांच्या स्वतःच्या अटींनुसार. तर एकीकडे मध्य पूर्वेमध्ये इज्राइल आणि पॅलेस्टाईन मधील संघर्ष पुन्हा पेटला आहे.

इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीत Presidential elections in Iran अनेक राजकीय व्यक्तींना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली होती. अशा परिस्थितीत रईसी यांचा विजय निश्चित मानला जात होता. शुक्रवारी रात्रीपर्यंत झालेल्या मतमोजणीत 90 टक्के मतांमध्ये रईसी यांना 62 टक्के मतं मिळाली असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अन्य तीन राष्ट्रपती उमेदवारांनी त्यांचा पराभव स्वीकारला.

उदारमतवादी गटाचे सध्याचे अध्यक्ष हसन रूहानी यांनी रईसी यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. रूहानी यांनी इराणचे अध्यक्ष म्हणून दोन वेळेस काम पाहिले आहे. मात्र, ऑगस्टमध्ये त्यांचा आठ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होईल. इराणमध्ये कोणताही उमेदवार जास्तीत जास्त दोन वेळा अध्यक्ष बनू शकतो.

नाजूर परिस्थितीत सत्तातर...

अत्यंत नाजूक परिस्थिती असतांना रईसी इराणची सत्ता सांभाळणार आहेत. जेव्हा अणुकराराला अमेरिकेतील सत्ता बदलल्यानंतर पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. इराण अणुकराराद्वारे अमेरिकेच्या निर्बंधातून सूट मिळण्याची अपेक्षा करत आहे. ज्यामुळे आर्थिक कामांना गती मिळू शकेल.

रईसी हे इराणचे ८१ वर्षीय सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खमनेई Ayatollah Ali Khameini यांचे जवळचे व्यक्ती मानले जातात. ज्यांच्याकडे इराणची खरी निर्णायक शक्ती असल्यातं मानलं जातं.

शुक्रवारी इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीत मतदानाची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली, कारण एकूण मतदान ५० टक्क्यांपेक्षा ही कमी झाल्याचं म्हंटलं जात होतं. बर्‍याच मतदारांनी मत न देणे योग्य समजले, कारण निवडणुकीत ४० महिलांसह ६०० दावेदारांमधून केवळ ७ लोकांची निवड करण्यात आली होती. तसेच यात सर्व पुरुष उमेदवार होते. यामध्ये एक माजी राष्ट्राध्यक्ष तसेच माजी लोकसभा अध्यक्षांचा समावेश होता.

राष्ट्रपती पदासाठी निवडणूकीत अन्य तीन प्रबळ दावेदारांपैकी अतिशय रुढीवादी मोहसीन रेजाई यांचा समावेश होता. What is the sentiment among Iranians अमीरुहोसेन काझीजादेह हाशेमी आणि सुधारवादी अब्दुलनासिर हेमाती यांनी निकालानंतर काही तासांनी पराभव स्वीकारून रईसी यांचे अभिनंदन केले. माजी अध्यक्ष तसेच लोकप्रिय नेते महमूद अहमदीनेजाद यांना निवडणुक लढण्यास बंदी घालण्यात आली होती. उमेदवार बंदी आणल्यामुळे संतप्त झालेल्या अहमदीनेजाद यांनी या पापामध्ये आपण सहभागी होणार नाही असे सांगत मतदानावर बहिष्कार टाकला होता..

Updated : 19 Jun 2021 3:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top