Home > News Update > Dhirendra Krishna Shastri :बागेश्वर महाराज नेमका कोण आहे?

Dhirendra Krishna Shastri :बागेश्वर महाराज नेमका कोण आहे?

Dhirendra Krishna Shastri :बागेश्वर महाराज नेमका कोण आहे?
X

पुरोगामी महाराष्ट्र मध्ये कधीच बुवाबाजीला थारा मिळाला नाही मिळाला तरी तो अनिस आणि प्रबोधनकारी संस्थांनी उधळून लावला परंतु आता महाराष्ट्रासह देशात चर्चेत असलेल्या धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांची... हेच महाराज बागेश्वर धामचे प्रमुख आहेत. महाराजांच्या दिव्य दरबारवर अंनिसकडून खुले चॅलेंज देण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव (Shyam Manav) यांनी यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं आणि महाराजांनी पळ काढला.

कधी भुतांना पळवण्याचा दावा, कधी पिशाच्चांचा पिच्छा पुरवण्याचा दावा, कधी दिव्य दृष्टीचा महिमा, तर कधी पत्रकारांला चॅलेन्ज, यामुळे बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) सोशल मीडिया आणि समाज माध्यमांमध्ये ट्रेडिंग मध्ये आहे. 26 वर्षाचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज... असलेलं हे व्यक्तिमत्व नेमकं आहे तरी काय?

कोण आहेत धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज?

बागेश्वर महाराजांचं मूळ नाव धीरेंद्र रामकृपाल गर्ग. त्यांचा जन्म 1996 साली त्यांचा झाला. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग. तीन भावंडांमध्ये धीरेंद्र हे सर्वात मोठे आहेत. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालं आहे. हे त्यांच्या दिव्य दरबारामध्ये सनातन धर्माचा पुरस्कार करत हिंदूंच्या संरक्षणासाठी सनातन धर्म टिकणे महत्त्वाचे असल्याचे सांगतात.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री तथाकथित महाराज कसे बनले?

धीरेंद्र यांचे आजोबा भगवानदास गर्ग हे निस्सिम हनुमान भक्त होते. बागेश्वरमध्ये असलेल्या हनुमान मंदिराचे ते पुजारी होते. त्यांच्याकडे दिव्यशक्ती होती, ज्याद्वारे ते लोकांचं भविष्य जाणून घ्यायचे, असा गर्ग कुटुंबियांचा दावा आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या या अलौकिक शक्तीमुळेच, आपल्याला लोकांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेण्याची सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा धीरेंद्र महाराज करतात.

जसं शिक्षण सुटलं, तसं धीरेंद्र महाराजांनी आपल्या आजोबांप्रमाणेच आपलाही दरबार भरवायला सुरुवात केली. अवघ्या सोळा-सतराव्या वर्षी धीरेंद्र महाराज लोकांच्या समस्यांच्या निराकरणाचा दावा करु लागले. सोबत रामकथा असल्याने रामभक्तांची गर्दी होऊ लागली. गर्दी वाढू लागली आणि धीरेंद्र महाराजांचे दरबार देशभरात होऊ लागला.

बागेश्वर बाबांची पद्धत काय?

उपस्थितांमधल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांना मंचावर बोलवायचं. त्यांची समस्या काय आहे, हे एका कागदावर लिहून दाखवायचं आणि त्या समस्येवर उपायही सांगायचा. हे महाराज लोकांच्या अंगातली भुतंही उतरवतात, असा दावा केला जातो. मध्येच मंचावरुन उतरायचं आणि अंगात संचारलेल्या लोकांपर्यंत जायचं आणि त्यानंतर भूतबाधा झालेल्यांना मंचापर्यंत बोलवायचं, अशी त्यांची पद्धत आहे.

बागेश्वर उर्फ धीरेंद्र महाराज जे दावे करतात, तो चमत्कार नसून समाजसेवा असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. जेव्हापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर महाराजांना चॅलेन्ज केलं, तेव्हापासून तर त्यांच्या दरबारात मीडियाचीही गर्दी झाली आहे. शुक्रवारी (20 जानेवारी)बाबांनी एका महिला पत्रकारालाच चॅलेन्ज दिलं आहे.

महिला पत्रकाराला दिलं चॅलेन्ज

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी महिला पत्रकाराला चॅलेंज देत, तुम्ही गर्दीतून कोणत्याही एका व्यक्तीला घेऊन या, त्या व्यक्तीच्या वेदना आणि समस्या मी आधीच लिहिन. यानंतर महिला पत्रकाराने लाखोंच्या गर्दीतून एका महिलेला बाहेर काढले. यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री ज्यांनी महिलेबाबत सांगितलेल्या गोष्टी तिच्या पत्रिकेत लिहिल्या असल्याचं बोललं जात आहे.

काय आहे अनिसचं चॅलेंज?

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhashraddha Nirmoolan Samiti) मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधिश्र्वर धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) यांना आगळंवेगळं आव्हान दिलंय. तुमच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करा आणि तीस लाख रुपये रोख पुरस्कार घ्या, असां आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी दिलं आहे.

धीरेंद्र कृष्ण महाराज यांची रामकथा नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर सुरू होती. याच दरम्यान धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे 7 आणि 8 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात दिव्य दरबार पार पडले. याच दरम्यान अनिसने काही आरोप केले आहेत. ठिकठिकाणी होणाऱ्या आपल्या दिव्य दरबारच्या माध्यमातून धीरेंद्र कृष्ण महाराज त्यांच्यात दिव्यशक्ती असल्याचा दावा करतात. त्या दिव्य शक्तीच्या माध्यमातून ते भाविकांच्या मनातील गोष्टी जाणून घेऊ शकतात. एखाद्या भाविकाने त्यांच्याकडे आपले नाव सांगितल्यास ते दिव्यशक्ती द्वारे त्याचा पत्ता, मोबाईल नंबर आणि जीवनातील इतर अनेक गोष्टींबद्दल माहिती देऊ शकतात, असा धीरेंद्र कृष्ण महाराज यांचा दावा असल्याचा अनिसचा आरोप आहे.

खरंच धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्यात दिव्यशक्ती असेल तर त्यांनी आम्ही सांगितलेल्या दहा लोकांच्या जीवनाबद्दल माहिती सांगावी. ही माहिती त्यांनी शंभर टक्के अचूक सांगण्या ऐवजी 90 टक्के अचूक सांगितली तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती धीरेंद्र कृष्ण महाराज यांना रोख 30 लाख रुपये देईल असे श्याम मानव म्हटले आहे. मात्र, या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी धीरेंद्र कृष्ण महाराज यांनाही तीन लाख रुपये अनामत रक्कम म्हणून भरावी लागेल, असे शाम मानव यांनी म्हटले आहे. परंतु यावर धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी कुठलेही चॅलेंज न घेता पळ काढणे पसंद केले.

धीरेंद्र कृष्ण महाराज जर त्या दहा लोकांसंदर्भात ते अचूक माहिती सांगू शकले नाहीत तर ते तीन लाख रुपये अनिसच्या खात्यात जमा होतील अशी अटही श्याम मानव यांनी घातली आहे. अनिसने यासंदर्भात नागपूर पोलिसांकडे तक्रार दिली असून जादूटोणाविरोधी कायद्याच्या तरतुदीनुसार नागपूर पोलिसांच्या दक्षता अधिकाऱ्याने स्वतः पुढाकार घेत त्यासंदर्भात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही अनिसकडून करण्यात आली आहे.

वीरेंद्र कृष्णशास्त्रांच्या दिग्द दरबारात नेहमी अनोळखी लोकांबद्दल चिठ्ठ्या काढून भविष्य वर्तवले जाते. नुकतच रायपूर मध्ये एबीपी माझा हिंदीचे पत्रकार ज्ञानेन्द्र तिवारी

यांची चिठ्ठी लागली. पत्रकार-शास्त्री यांच्या दरम्यानचे प्रश्न

दरअसल मंच से धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले की, आपण ज्या पत्रकाराचा चाचा नाम भृगुनाथ तिवारी आहे त्यांनी यावे. एबीपी न्यूज के ज्ञान पत्रकार तिवारी ने उत्तर दिले. जी हां चा भोपालचे असून मथुरा मध्ये राहतात. त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री ने विचारले तुमचा भाई का नाम राघवेंद्र तिवारी है? काय तुमचा भावाने नवे घर बांधले का? बनवाया है? उत्तर आले दोन दिवसांपूर्वी पहिले ही मोठे भाऊ राघवेंद्र तिवारी ने नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला आहे. यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री ने ज्ञानेंद्र तिवारीच्या भाचीचे नाव सांगितले. बागेश्वर बाबाचा जयजयकार करतानाचा पत्रकार तिवारी याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

परदेशातही भरले बाबांचे दरबार

धीरेंद्र महाराजांचे हे दावे आणि त्यांचे चमत्कार हा सध्या ट्रेन्डिंग विषय बनला आहे. कारण अवघ्या 26 वर्षांचा तरुण गेल्या 10 वर्षांपासून लाखो लोकांचा देव बनला आहे. या देवाला अंनिसने आव्हान दिलं आहे, जे आव्हान महाराजांनी स्वीकारलं आहे. हे चॅलेंज कोण जिंकणार, हे आता पाहावं लागेल.

Updated : 21 Jan 2023 2:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top