Home > News Update > 'व्हाईट कोट लिजेंड्स'; डॉ. तात्याराव लहाणे यांचा माहितीपट प्रदर्शित

'व्हाईट कोट लिजेंड्स'; डॉ. तात्याराव लहाणे यांचा माहितीपट प्रदर्शित

व्हाईट कोट लिजेंड्स; डॉ. तात्याराव लहाणे यांचा माहितीपट प्रदर्शित
X

जेष्ठ नेत्रशल्यविशारद, पद्मश्री, डॉ. तात्याराव लहाणे यांचा माहितीपट प्रदर्शन सोहळा २२ जुलै रोजी सायंकाळी वांद्रेच्या पश्चिम येथील ताज 'लँड्स अँड हॉटेलमधील बॉलरूममध्ये मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. 'व्हाईट कोट लिजेंड्स' असे या माहिती पटाचे नाव आहे. या माहितीपटाचे आयोजन प्रसारण 'डॉकफ्लिक आणि मॅनकाईंड' या कंपनीने केले होते. यावेळी समाजासाठी झटणाऱ्या ५० डॉक्टरांवर माहितीपट बनवन्यात आले आहे, त्या पैकी एक व्यक्तीमहत्व म्हणजे डॉ. तात्याराव लहाने यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होत्या, त्यामध्ये त्यांच्या पत्नी सुलोचना लहाने व कुटुंबातील नातेवाईक व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. त्यासह मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री किशोरी शहाने, अभिनेता अविनाश नारकर आणि पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर उपस्थित होत्या.

गेली ३० वर्ष डॉ. तात्याराव लहानेच्या सहकारी राहिलेल्या डॉक्टर रागिनी पारेख या सुध्दा उपस्थित होत्या, मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना त्या म्हणाल्या की, या माहितीपटाच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा मिळावी हा हेतू या माहितीपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. असे मत डॅाक्टर रागिनी पारेख यांनी व्यक्त केले.

डॉ. तात्याराव लहाने मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना म्हणाले की, मला फार आनंद वाटतो की 'डॉकफ्लिक आणि मॅनकाईंड कंपनीने "व्हाईट कोट लिजेंड्स" ही डॅाक्युमेंट्री केली, या माध्यमातून पुढे काम करण्याची मला उर्जा मिळेल असे मी मानतो. असे मतं डॉ. तात्या लहाने यांनी व्यक्त केले.

Updated : 23 July 2023 2:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top