अंबाबाई मंदिर अनलॉक कधी होणार? दर्शनासाठी नियमावली तयार

When will the Ambabai temple be unlocked? Prepared rules for darshan

264

लॉकडाऊन च्या काळात लॉक झालेली राज्यातील मंदीर लवकरच अनलॉक होणार आहेत. ही मंदिरं लवकरच भविकांसाठी खुली होण्याचे संकेत आहेत. याच पार्श्वभूमीवर साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या कोल्हापूरातील अंबामातेचं मंदीर देवीच्या दर्शनासाठी उघडलं जाणार आहे.

भक्तांना या नियमावलीत राहूनच भक्तांना देवीचे दर्शन मिळणार आहे. मंदिरं खुले झाले तरी मंदिराच्या चारही दरवाजातून ये-जा करता येणार नाही. भक्तांसाठी केवळ एकच दरवाजा खुला ठेवला जाईल. भक्तांच्या संख्येवरही मर्यादा असेल, त्यासाठी शासनाने घातलेल्या सर्व अटी नियमांचे पालन केले जाईल. मात्र, राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर मंदिर सुरू करण्यात येईल असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांना मास्कची सक्ती असेल. आत प्रवेश करणाऱ्या सर्वांचे थर्मल टेस्टिंग होईल. सॅनिटायझरचा वापर केला जाईल. मंदिरात पूजेसाठी घेऊन जाणाऱ्या खण, ओटी साहीत्यावरही निर्बंध असतील. कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, सुरुवातीचे काही दिवस भक्तांना थेट गाभाऱ्यात प्रवेश न देता पितळी उंबऱ्यापासून दर्शन देण्याचाही देवस्थान समितीचा विचार सुरू आहे.

देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील मंदिरे दर्शनासाठी लवकरच खुली होतील, अशी आशा सर्वसामान्य भक्ताला लागून राहिली आहे. पण, मंदिरे खुली झाली तरी भक्तांना सहज देवदर्शन होणे कठिण आहे. शासन आणि मंदिर व्यवस्थापनाच्या काटेकोर नियमांचे पालन करुनच देवदर्शन घ्यावे लागणार आहे. कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि राज्यात सुरु असलेली बिकट परिस्थिती यामुळे महाराष्ट्र शासनाने अद्याप मंदिरे अनलॉक केलेली नाहीत. पण मुंबईत नुकत्याच झालेल्या कोविड टास्क फोर्स बैठकीत येत्या तीन ते चार दिवसात मर्यादित क्षमतेने मंदिर आणि रेस्टॉरंट सुरू करण्यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे लवकरच अनलॉक होतील असे संकेत आहेत.

Comments