Home > News Update > मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार? वाचा केंद्र सरकार काय म्हणाले...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार? वाचा केंद्र सरकार काय म्हणाले...

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवा यासाठी राज्यभरातून केंद्र सरकारकडे जोरदार मागणी केली जात आहे. त्यातच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार याबाबत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार? वाचा केंद्र सरकार काय म्हणाले...
X

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार याबाबत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला. यावेळी सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी महत्वाची माहिती दिली. तर यावर मंत्रालय स्तरावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जोरदार मागणी केली जात आहे. त्यातच नाशिक येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनातही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एकमुखाने ठराव संमत करण्यात आला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र केंद्र सरकारच्या स्तरावर याबाबत निर्णय झाला नव्हता. मात्र प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याविषयी इंग्रजीतून प्रश्न विचारला. यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी सांगितले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर चर्चा सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल.

देशात आतापर्यंत तमिळ, तेलगु, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. तर एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी त्या भाषेचा 1500 ते 200 वर्षांचा नोंदणीकृत इतिहास असावा आणि प्राचिन काळातील त्या भाषेतील साहित्याचे पुरावे असावेत व त्या भाषेत मुळ साहित्यिक परंपरा असावी, जी इतर भाषांमधून आलेली नसावी, अशा अटी अभिजात भाषेचा दर्जा देतांना ठेवल्या आहेत. या अटींची पुर्तता करून महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, अशी माहिती अर्जुन मेघवाल यांनी सांगितली.

Updated : 4 Feb 2022 3:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top