शिवदास ढवळेंना तात्काळ न्याय द्या: राहुल अनविकर
X
प्राण्यांच्या हत्येप्रकरणी १० वर्षांपासून कारवाईसाठी पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते शिवदास ढवळे यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात विचारवंत, प्रबोधनकार देखील सरकारकडे न्यायाची मागणी करत आहेत. नांदेड जिल्ह्यात शिवदास ढवळे यांनी वनविभागाने शिकाऱ्यांवर कारवाई केली नाही. म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
या संदर्भात राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अनविकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना बौद्ध समाजावर वर्षोनुवर्षे अन्याय होत आला आहे. माझी समाजाला विनंती आहे की, पूर्ण समाजाने एकत्र येऊन अशा प्रवृत्तीच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. जोपर्यंत आंबेडकरी समाज शासक होत नाही. तोपर्यंत अशा प्रकारे अन्याय होतच राहिल. शिवदास ढवळे यांना शासनाने तात्काळ न्याय द्यायला हवा. अशी मागणी राहुल अनविकर यांनी केली आहे.
कोण आहेत राहुल अनविकर?
राहुल अनविकर हे प्रतिष्ठीत मॅगझिन आऊटलुक मध्ये राहुल अन्वीकर यांचं नुकतंच नाव प्रसिद्ध झालं आहे. आऊटलूक मॅगझिनने ५० प्रभावशाली, दलीत परीवर्तनकारी व्यक्तींच्या नावाची यादी आऊटलुक मॅक्झीनमध्ये जाहीर केली आहे. राहुल अनविकर यांनी शिवदास ढवळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून राहुल अनविकर यांना शासनाने तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान शिवदास ढवळे यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच आरोपींना तात्काळ ताब्यात घ्यावे अशी मागणी केली आहे .
जिल्ह्यातील लोहा तालुक्यात चोंडी येथे वनविभाग नांदेड परिक्षेत्रा अंतर्गत चोंडी येथील महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला बांधकाम करतांना दहा वर्षांपूर्वी चार हरीण, दहा मोरांची हत्या झाली होती. या प्रकरणात आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी ढवळे यांनी वन विभागाशी वारंवार पत्रव्यवहार केला. परंतु या प्रकरणात चौकशी होत नसल्याने शिवदास ढवळे यांनी राज्याचे गृहमंत्री, नांदेड जिल्हाधिकारी ,नांदेड वन विभाग ,जिल्हा पोलिस प्रशासन यांना 16 मार्च रोजी निवेदन देऊन या प्रकरणात चौकशी करावी अन्यथा 28 एप्रिल रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
वन विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे अखेर 28 रोजी चोंडी बंधाऱ्यावर जाऊन शिवदास ढवळे यांनी आत्मदहन केले . आत्मदहनापूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे लिहिली आहेत. नातेवाईकांनी आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे . याप्रकरणी सुदमताबाई देविदास गीते, देविदास जळबा गीते, सदाशिव देविदास गीते, ज्ञानेश्वर देविदास गीते, गोविंद हरिश्चंद्र केंद्रे,सटवा सांगळे (सर्व राहणार चोंडी) यांच्या विरोधात माळाकोळी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते देखील सरकारकडे न्यायाची मागणी करत आहेत.