नेते आंदोलनात व्यस्त, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं भाजपचं कार्यालय सॅनिटाइज

आज एकीकडे राज्यातील सरकारविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे “मेरा अंगण, मेरा रणांगण’असे आंदोलन करण्यात व्यस्त होते. तेव्हाच राष्ट्रवादी कॉंग्रेस चे कार्यकर्ते पुण्यामध्ये भाजप नेत्यांचं कार्यालय सॅनिटाइज करत होते. या संदर्भात शरद क्रीडा आणि संस्कृती  प्रतिष्ठान चे अध्यक्ष लक्ष्मीकांत खांबिया यांनी ट्विट केलं आहे.

एक्कीच मारा .. पण सॉल्लीड मारा ! भाजपचे नेते महाराष्ट्र बचाओ च्या राजकीय स्टंट मध्ये बिझी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाऊन भाजप कार्यालय सॅनिटाइज करून दिलं अशा आशयाचं ट्वीट खांबिया यांनी केलं आहे.