Home > News Update > भिती वाटत असेल तर व्हाट्सअप डिलीट करा : दिल्ली हायकोर्ट

भिती वाटत असेल तर व्हाट्सअप डिलीट करा : दिल्ली हायकोर्ट

आपणास व्हॉट्सअ‍ॅप आपल्या महितीसोब तडजोड करत आहे असे जर वाटत असेल तर ते डिलीट करून टाका, असा अजब सल्ला देत दिल्ली हायकोर्टाने व्हाट्सएपच्या नवीन गोपनीयता धोरणासंदर्भात याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले आहे.

भिती वाटत असेल तर व्हाट्सअप डिलीट करा : दिल्ली हायकोर्ट
X

व्हाट्सएपच्या नवीन पॉलिसी वरून सध्या सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. जगभरातून या पॉलीसीला विरोध होत आहे. या नवीन धोरणानुसार व्हाट्सएप आता त्यांच्या संलग्न असणाऱ्या अन्य कंपन्यांसोबत सुद्धा माहिती पुरवू शकणार आहे. व्हाट्सएपच्या या नवीन धोरणास आव्हान देवणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावरील सूनवाई दरम्यान व्हाट्सएपचे नवीन धोरण मान्य नसेल तर ते डिलिट करा.

फक्त व्हाट्सएपच असे करत नाही हे तुम्हाला माहीत आहे का? गुगल मॅप कडून देखील माहिती शेअर केली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? याव्यतिरिक्त कोणतं अँप तुम्ही वापरत असाल तर त्या अँपच्या अटी व शर्ती वाचल्या आहेत का याबाबत मला शंका आहे. असे सांगत याचिकाकर्त्याचा चांगलाच समाचार घेत २५ जानेवारी पर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.

एका वकिलांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन धोरणाविरोधात याचिका दाखल केली आहे आणि असे म्हटले आहे की, व्हाट्सएपचे हे नवीन धोरण घटनेने दिलेल्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात असल्याने सरकारने त्याविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. व्हाट्सएपला सामान्य लोकांशी संबंधित वैयक्तिक माहिती गोळा करायची आहे, हे थांबविणे आवश्यक आहे.

व्हाट्सएपच्या बाजूने युक्तीवाद करताना ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी व्हाट्सएप अगदी सुरक्षित असून व्हाट्सएप कडून कोणत्याही प्रकारची वयक्तिक तसेच खाजगी माहिती कोणत्याही संलग्न कंपनीला पुरवली जात नाही. तुम्ही तुमच्या मित्रांसोबग, नातलगांसोबत अथवा कोणासोबतही करत असलेले संभाषण हे पूर्णता सुरक्षित असल्याचे सांगितले.

वव्हाट्सएपने जे धोरण बदलले होते त्यानंतर ८ फेब्रुवारी पर्यंत वापरकर्त्यांनी नवीन अटी स्वीकारल्या पाहिजेत. असे सांगून वापरकर्त्यांना मेसेज पाठवले होते. परंतु व्हाट्सएप वर होत असलेल्या जोरदार टीका व बोरोधानंतर आता कंपनीने हे धोरण पुढे ढकलले आहे.

Updated : 18 Jan 2021 11:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top