Home > News Update > WhatsApp वादग्रस्त Privacy Policy वर ठाम: पुन्हा अटी स्वीकारण्याची अट

WhatsApp वादग्रस्त Privacy Policy वर ठाम: पुन्हा अटी स्वीकारण्याची अट

नव्या वर्षाच्या सुरूवातीला वादग्रस्त नवी प्रायव्हसी पॉलिसीवपरुन प्रचंड गदारोळ आणि टीका झाल्यानंतर शरणागती पत्करलेले इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsAppन पुनश्च एकदार गोपनीयता संबंधित अटी व धोरणे पुन्हा लागू करणार आहे. WhatsApp ने आता पुन्हा नवीन प्रायव्हसी पॉलिसी जारी करत युजर्सचा संभ्रम होऊ नये यासाठी शब्दांचा काळजीपूर्वक वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.

WhatsApp वादग्रस्त Privacy Policy वर ठाम: पुन्हा अटी स्वीकारण्याची अट
X

अ‍ॅपमध्ये एका छोट्या बॅनरद्वारे युजर्सना आपली नवीन पॉलिसी समजावण्याचा WhatsApp चा प्रय़त्न आहे. 15 मे पर्यंत ही पॉलिसी स्वीकारावी लागेल. जानेवारीमध्ये नवीन प्रायव्हसी पॉलिसी जारी केल्यानंतर WhatsApp वर जगभरातून टीका झाली, त्यानंतर कंपनीने माघार घेत नवीन पॉलिसी लागू होण्याची तारीख पुढे ढकलली होती. टीका झाल्यानंतरही कंपनीने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केलेला नाही, तर आता कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा घोषणा केली आहे.

पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही, असं स्पष्टीकरण WhatsApp कडून देण्यात आलं आहे. तसेच, नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे असा कंपनीचा दावा आहे. तुमचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच 100 टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने दिलं आहे. तसेच, नवीन पॉलिसी 15 मेपासून लागू होईल, असं व्हॉट्सअ‍ॅपकडून जाहीर करण्यात आलंय.

नव्या व्हाट्सअप पॉलिसी आणल्यापासून WhatsApp अनइन्स्टॉल करणाऱ्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं असून सिग्नल, टेलिग्राम आणि संदेश यांसारख्या अ‍ॅप्सवरील युजर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या गोपनीयता धोरणात काही बदल केले आहेत. पण हे बदल वापरकर्त्यांची गोपनीयता गुंडाळण्यास पुरेसे आहेत. यातील पहिला बदल म्हणजे, वापरकर्त्यांच्या माहितीचे संकलन आणि प्रक्रिया. या बदलानुसार व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांच्या मोबाइलमधील बॅटरीची सद्यस्थिती, नेटवर्क सिग्नल, मोबाइल क्रमांक, आयपी अ‍ॅड्रेस, मोबाइल कंपनी, भाषा आणि कालक्षेत्र (टाइमझोन) अशी सगळी माहिती व्हॉट्सअ‍ॅपला वेळोवेळी गोळा करता येणार आहे. सध्याच्या स्मार्टफोनवरील अनेक अ‍ॅपमध्ये अशाप्रकारची माहिती गोळा करण्याची मुभा आपण आधीच देऊन टाकलेली आहे. पण व्हॉट्सअ‍ॅप पहिल्यांदाच वापरकर्त्यांची अशी माहिती गोळा करत आहे. ती कशासाठी, या प्रश्नाला ठरावीक गोंडस उत्तर 'अ‍ॅपच्या अद्यतन आणि वापरकर्त्यांच्या सहजतेसाठी' असे देण्यात आलेले आहे.

यातील दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे, यापुढे 'व्हॉट्सअ‍ॅपवरील बिझनेस खाती त्यांच्या व्हॉटसअ‍ॅप चॅटमधील माहिती फेसबुकशी संबंधित अन्य खात्यांशी शेअर करू शकतील'. हा बदल वरकरणी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवरून व्यवसाय करणाऱ्यांपुरता मर्यादित वाटत असला तरी, त्याचा थेट परिणाम सामान्य वापरकर्त्यांवर होणार आहे. म्हणजे, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरून एखाद्या बिझनेस गटाशी (ग्रुप) संलग्न असाल तर तुम्ही त्या ग्रुपवरून शेअर केलेली माहिती किंवा तुमची माहिती कशी वापरायची आणि कुणाशी शेअर करायची याचा अधिकार संबंधित बिझनेस खात्याला असणार आहे.

याचाच अर्थ, येथेही तुमची गोपनीयता भंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपनेच अत्यंत साळसूदपणे, 'यापुढे बिझनेस खात्यांशी आपली माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगा. तुमची माहिती अनेकांना दिसू शकते' असे या गोपनीयता धोरणातच म्हटले आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवर जमा होणारी सर्व माहिती फेसबुकच्या कंपन्यांना पुरवण्यात येईल, असेही या धोरणात म्हटले आहे. नागरीकांचा रोष वाढल्यानंतर माघार घेणारं व्हाट्सअप आता युजर्सचा रोष वाढल्यानंतर काय करणार हे पाहनं आता महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 19 Feb 2021 9:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top