मैं शेर का बेटा हूं, घायाळ चिराग पासवान ने काकासह नितिश कुमारला ललकारलं
Xcourtesy social media
दिवंगत नेते राम विलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान स्वत:च्याच पक्षात एकटे पडले आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या चिराग पासवान यांना त्यांचेच काका पशुपती कुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांनी धोबी पछाड केलं आहे. सध्या लोकजनशक्ती (LJP) पक्षाचे 6 खासदार (6 MP OF LJP) आहेत. यातील 5 खासदारांनी पक्षाशी बंड करत पशुपती कुमार पारस (Pashupati Kumar Paras). यांची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड केली आहे. त्यामुळं लोकजन शक्ती पक्षात फक्त एकच खासदार शिल्लक राहिला आहे.
पक्षाची अशा प्रकारे मोडतोड झाल्यानंतर चिराग पासवान (Lok Janshakti Party LJP) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जनतेशी संवाद साधला. चिराग पासवान(Chirag Paswan) यांनी आज 16 जूनला पत्रकारांशी साधलेल्य़ा संवादामध्ये
माझी गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नाही. जे झालं आहे. ते माझ्यासाठी ठीक नाही. मी औषधं घेऊन आलो आहे. आता आपल्याला मोठी लढाई लढावी लागणार आहे. आणि मी प्रत्येक वेळेस प्रश्नांची उत्तर देईल.
चिराग पासवान ने मंगळवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीत पशुपति कुमार पारससह बंड करणाऱ्या 5 खासदारांची हकालपट्टी केली आहे.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
विधानसभा निवडणूकीत एलजेपी (LJP) जिंकली आहे. आकड्यात पाहू नका. आपण 6 मत मिळवली.
रामविलास पासवान रुग्णालयात असताना देखील पार्टी तोडण्याचा प्रयत्न झाला.
नितिश कुमार सोबत गेलो असतो तर बहुमत मिळालं असतं. मात्र, मला नतमस्तक व्हावं लागलं असतं.
विधानसभा निवडणुकीत काकांचा सहयोग मिळाला नाही.
मला बोलले असते तर मी काकांना संसदीय दलाच्या नेतृत्व दिलं असतं.
जेडीयू ने समाजाला वेगळं करण्याचं काम केलं. मी वाघाचा मुलगा आहे.
जेडीयू ने धोका दिला... पहिल्या घरातील आटोपतो...