Home > News Update > नगर प्रकरणात अजित पवार विधानसभा अध्यक्षांना काय सांगणार?

नगर प्रकरणात अजित पवार विधानसभा अध्यक्षांना काय सांगणार?

नगर प्रकरणात अजित पवार विधानसभा अध्यक्षांना काय सांगणार?
X

अहमदनगर बलात्कार पीडितेला मारहाण प्रकरणाचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. याप्रकरणी आक्रमक होत सदर पोलिसाला सेवामुक्त करण्याचे आदेश देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यांची शासनाने दखल घेऊन तात्काळ आजच निवेदन द्यावे असे निर्देश दिले आहेत. ‘मॅक्स महाराष्ट्र’ने हे प्रकरण समोर आणलं होतं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात या प्रकरणाची वस्तुस्थिती वेगळी असल्याचं सांगत वर्तमानपत्रात छापून आलेले वृत्त आणि वस्तुस्थिती वेगळी असल्याचे सांगितलंय. तसंच या संदर्भात अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते यांना याची माहिती दिली जाईल असंही ते म्हणाले.

यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी माझ्या दालनात ५ वाजता बैठक लावा आणि माहिती द्या, असे निर्देश शासनाला दिले आहेत.

ज्याअर्थी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं की, माध्यमांमध्ये छापून आलेल्या बातम्या आणि वस्तुस्थिती यामध्ये फरक आहे, त्याअर्थी त्यांच्याकडे काहीतर ठोस माहिती असणार आहे. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत अजित पवार विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना काय माहिती देतात हे बघणं महत्वाचं आहे.

Updated : 3 March 2020 9:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top