Home > News Update > बोगद्यामधून ४१ कामगारांना बाहेर काढण्याची काय होती कार्यपद्धत ?

बोगद्यामधून ४१ कामगारांना बाहेर काढण्याची काय होती कार्यपद्धत ?

बोगद्यामधून ४१ कामगारांना बाहेर काढण्याची काय होती कार्यपद्धत ?
X

नवी दिल्ली- उत्तराखंडातील सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांची अखेर बाहेर काढण्यात यश आले आहे. तब्बल १७ दिवसांनी या श्रमिक कामगारांची सुटका झाली आहे. या सर्व कामगारांना बाहेर काढत त्यांना आरोग्य उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

12 नोव्हेंबरपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू होतं. अनेकदा डोंगर खचत असल्याने त्याठीकाणी पुन्हा ब्लॉकेज होतं होते. याकरिता विदेश तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील या मदतकार्याकडे लक्ष ठेवून होते. तसेच देशातील विविध एजेन्सी मदतकार्यामध्ये गुंतल्या होत्या. त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे. सर्व मजूर बाहेर आल्याने सर्व भारतीयांमध्ये आनंदाची भावना आहे.

बाहेर काढण्याची कार्य पद्धत

12 नोव्हेंबरला उत्तराखंडातील सिल्क्यारा बोगद्याचा काही भाग कोसळला यामध्ये 41 श्रमिक मजूर त्यामध्ये अडकले होते.

13 नोव्हेंबरला पाईपद्वारे टाकत या मजुरांशी संपर्क झाला आणि त्यांना पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची सुरूवात झाली.

14 नोव्हेंबरला ढिगाऱ्याच्या आत 800-900 मिमी व्यासाचे स्टील पाईप ऑगर मशीनद्वारे टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सतत ढिगारा खाली पडत असल्याने यामध्ये दोन कामगार किरकोळ जखमीही झाले. यादरम्यान अन्न, पाणी, ऑक्सिजन, वीज आणि औषधं मजुरांपर्यंत पोहोचत यश आलं होतं.

15 नोव्हेंबरला ऑगर मशीनबद्दल पूर्णपणे समाधानी नसल्यामुळे दुसऱ्या NHIDCL ने दिल्लीहून एअरलिफ्ट केलेल्या नवीन अत्याधुनिक ऑगर मशीनची मागणीकरण्यात आली होती.

16 नोव्हेंबरला नवीन ड्रिलिंग मशीनने खोदकाम सुरु केलं होतं.

17 नोव्हेंबरला मात्र, यातही काही अडथळे आल्याने इंदूरहून तीसर ऑगर मशीन मागवण्यात आलं याला यश न आल्यानं. नंतर काम थांबवावं लागलं.

18 नोव्हेंबरला पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी आणि तज्ज्ञांनी नव्या योजनेवर काम सुरू करण्याचे आदेश दिले होते

19 नोव्हेंबरला ड्रिलिंग थांबलं आणि यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला होता.

20 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी फोनवर चर्चा करून बचाव कार्याचा आढावा घेतला होता.

21 नोव्हेंबरला बोगद्यात अडकलेल्या या कामगारांचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला.

22 नोव्हेंबरला 800 मिमी जाडीचा स्टील पाईप सुमारे 45 मीटरपर्यंत पोहोचला. मात्र त्यादिवशी सायंकाळी ड्रिलिंगमध्ये काही अडथळे निर्माण झाल्याने काम थांबवण्यात आलं होतं .

23 नोव्हेंबरला या मशीनला तडा गेल्याने पुन्हा ड्रिलिंग थांबवावं लागलं होतं.

24 नोव्हेंबरला शुक्रवारी पुन्हा खोदकाम सुरू झाले काही वेळांनतर ऑगर मशीन तुटल्याने तिला कापून बाहेर काढावं लागलं. त्यामुळे तेही कामं थांबवावं लागलं.

25 नोव्हेंबरच्या दरम्यान मॅन्युअल ड्रिलिंग (हाताने खोदकाम) सुरु केलं गेलं.

26 नोव्हेंबरला सिल्क्यारा-बारकोट बोगद्याच्या वरच्या टेकडीवर उभे खोदकाम (व्हर्टिकल ड्रिलिंग) सुरु केले होतं.

27 नोव्हेंबरला व्हर्टिकल ड्रिलिंग सुरूच होतं.

28 नोव्हेंबर रोजी दुपारी बचाव पथक कामगारांपर्यंत पोहोचले आणि बोगद्यात पाईप टाकण्याचं काम पूर्ण झालं. यानंतर कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. अशा पद्धतीने १७ दिवसानंतर सगळ्या कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं.

Updated : 29 Nov 2023 9:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top