Home > News Update > वृत्तपत्रातील 'या' चार रंगीत ठिपक्यांचा अर्थ काय?

वृत्तपत्रातील 'या' चार रंगीत ठिपक्यांचा अर्थ काय?

वृत्तपत्रातील या चार रंगीत ठिपक्यांचा अर्थ काय?
X

अनेक वेळा आपल्यासमोर अशा गोष्टी येतात. त्याची उत्तर आपल्याला माहिती नसतात. किंबहूना ते प्रश्न मनात तसेच राहून जातात. त्यामुळं मनात सतत 'हे असं का असेल?' या विचारात आपण राहतो. मात्र, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही. आज आपण अशाच एका गोष्टी बाबत जाणून घेणार आहोत.

देशभरात लाखो लोक दररोज वृत्तपत्र वाचतात, पण तुमच्या कधी हे लक्षात आलं आहे का, की वृत्तपत्राच्या तळाशी वेगवेगळ्या रंगाचे ठिपके का असतात? अनेकवेळा हा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

तर त्या रंगीत ठिपक्यांचा अर्थ असा आहे...

पूर्वी जिथे कृष्णधवल (black and White) वर्तमानपत्र यायची, आता त्यांच्या जागी रंगीत वर्तमानपत्रे येऊ लागली आहेत, म्हणजे आता तुमचं वृत्तपत्र रंगीत झालं आहे. पूर्वी वृत्तपत्रेही कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) यायची पण आता काळ बदलल्याने वर्तमानपत्रातही बदल होऊ लागले आहेत.

का लावले जातात हे ठिपके?

आपल्या सगळ्यांना तीन महत्त्वाचे रंग माहिती आहेत. लाल, पिवळा आणि निळा. या रंगाना मूळ रंग (बेसिक कलर) देखील म्हटलं जातं. निळा cyan (C) , गुलाबी magenta (M), पिवळा yellow (Y), आणि काळा black या रंगाच्या समुहाला CMYK म्हणतात. CMYK ला रजिस्ट्रेशन मार्क देखील म्हटलं जातं.

आता तुम्ही हे रंग जाणून घेतले. जेव्हा वृत्तपत्राची छपाई सुरु असते. तेव्हा प्रिन्ट काढणारा व्यक्ती हे डॉट पाहतो. जर हे डॉट ठीक येत नसतील तर वृत्तपत्रात छापले जाणारे फोटो देखील खराब येतात. त्यामुळे छपाई करणारा व्यक्ती वृत्तपत्राच्या तळाशी असलेले हे चार डॉट पाहत असतो. थोडक्यात वृत्तपत्रावरील हे ठिपके वृत्तपत्रावर योग्य कलर पॅटर्न बनवण्यासाठी डॉट मार्कर म्हणून काम करतात.




अनेक वृत्तपत्रात या CMYK रंगाच्या सेड देखील वापरलेल्या असतात. मात्र, ज्या वृत्तपत्रामधील हे डॉट ठीक आलेले नसतात. त्या वृत्तपत्राची छपाई ठीक झाली नाही. असं समजलं जातं.

कधी कधी आपल्या वृत्तपत्रातील फोटो खराब दिसतात. अशा वेळी आपण फोटो खराब असल्याचा अंदाज लावतो. मात्र, अनेक वेळा वृत्तपत्रातील फोटो खराब नसतो तर प्रिन्टर खराब असल्यानं छपाई व्यवस्थित झालेली नसते. अशा वेळी तुम्हाला जर फोटो खराब आहे की प्रिन्ट खराब आहे. हे जाणून घ्यायचं असेल तर हे ठिपके आवश्य पाहा. थोडक्यात रंगाचे ठिपके जर प्रिन्टमध्ये इकडे - तिकडे झाले असतील. किंवा दुसरा रंग कोणत्याही रंगामध्ये विखुरला गेला असेल तर वृत्तपत्राची प्रिन्ट खराब असते.

त्यामुळं प्रिन्ट काढणारा व्यक्ती वृत्तपत्रातील हे ठिपके पाहत असतो. प्रिन्टमध्ये हे ठिपके ठीक नसतील तर तो प्रिन्टरचं टोनर ठीक करुन पुन्हा प्रिन्ट काढून पाहतो. हे चार ठिपके ठीक असतील तर तो प्रिन्ट काढतो.

Updated : 7 Nov 2021 10:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top