Home > News Update > चित्रपटावरून पुण्यात राडा..! नक्की काय घडलं ? वाचा थोडक्यात

चित्रपटावरून पुण्यात राडा..! नक्की काय घडलं ? वाचा थोडक्यात

प्रभास चंद्रा ह्यांच्या एका चित्रपटावरून हिंदुत्ववादी संघटनेने पोस्टर फाडत चित्रपटा दरम्यान राडा घातला आहे.

चित्रपटावरून पुण्यात राडा..!  नक्की काय घडलं ? वाचा थोडक्यात
X

पुणे : पुण्याच्या एनएफएआय या प्रतिष्ठित चित्रपट संवर्धन संस्थेत काही हिंदुत्व वादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एका चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राडा घातला आहे.

या वेळी 'आय एम नॉट द रिव्हर झेलम' हा चित्रपट बंद पाडण्यात आला आशी माहिती समोर येत आहे. चित्रपटांमध्ये भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्य मुजकूर असल्याचा आरोप करत हा चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला यादरम्यान पोस्टर देखील फडण्यात आले.

पुणे इंटरनॅशनल सेंटर आयोजित 'सिनेमा ऑफ इंडिया' चित्रपट महोत्सवात 'आय एम नॉट द रिव्हर झेलम' हा चित्रपट पुणे इंटरनॅशनल सेंटर आयोजित 'सिनेमा ऑफ इंडिया' चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येत होता.

संबधीत चित्रपट प्रभास चंद्रा यांनी लिहून दिग्दर्शित केलेला आहे. ह्या चित्रपट काश्मीरमधील एका मुलीच्या आठवणींवर आधारित होता आशि माहिती सामोरं येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार हे चित्रपट प्रदर्शन सर्वांसाठी खुलं होत. ह्या दरम्यान

समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य च्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गोंधळ घातला असून महोत्सवाचे पोस्टर देखील फाडले आहे. ह्या नंतर चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं असल्याचं कळतं. दरम्यान सर्व आंदोलन करताना डेक्कन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी चालू आहे.

समजस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी पडवळ आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या काही कार्यकर्त्यांना डेक्कन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


Updated : 11 Feb 2024 4:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top