Home > Election 2020 > शॅडो कॅबिनेट म्हणजे काय रे भाऊ?

शॅडो कॅबिनेट म्हणजे काय रे भाऊ?

शॅडो कॅबिनेट म्हणजे काय रे भाऊ?
X

आज मनसेचा 14 वा वर्धापन दिन. त्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वाशी येथे सभा पार पडली. या सभेत अनिल शिदोरे यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. या शॅडो कॅबिनेटमध्ये ( प्रति कॅबिनेट ) मनसे च्या जवळ जवळ सर्व नेत्यांचा समावेश आहे.

मनसे ने शॅडो कॅबिनेटची घोषणा केल्यानंतर नक्की हे शॅडो कॅबिनेट काय असतं? असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. शॅडो कॅबिनेट ही पाश्चात्य संकल्पना आहे. ज्या देशामध्ये लोकशाही आहे. अशा देशामध्ये विरोधी पक्ष सत्ता पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी प्रति मंत्री मंडळाची स्थापना करुन सरकारच्या कामकाजावर नजर ठेवण्याचं काम करतो. विरोधी पक्षाने नेमून दिलेला प्रति कॅबिनेट मंत्री सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांवर नजर ठेवण्याचं काम करतो. शॅडो कॅबिनेट एक प्रकारे प्रति सरकार प्रमाणे काम करते. मात्र, त्यांना सरकारचे अधिकार नसते.

देशात अशी प्रति कॅबिनेट या अगोदर स्थापन झाली आहे का? तर होय. भारतात पहिली शॅडो कॅबिनेट आपल्याच महाराष्ट्रात स्थापन झाली.

महाराष्ट्रात 2004 ला विलासराव देशमुख यांचे सरकार असताना विरोधात असलेल्या शिवसेना-भाजपनं शॅडो कॅबिनेटची स्थापना केली. हा भारतातला पहिलाच प्रयोग होता. यावेळी शिवसेना नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली 43 प्रति कॅबिनेट मंत्र्यांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये भाजपचं नेतृत्व दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्याकडे होते. त्यामुळं हा प्रयोग महाराष्ट्राला नवीन नाही. विशेष म्हणजे शॅडो कॅबिनेट स्थापन करुनही शिवसेना भाजप युतीला 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी बहुमत मिळवता आलं नव्हतं. त्यामुळं मनसेला या शॅडो कॅबिनेटमधून काय साध्य होणार हे महत्वाचं आहे.

राज ठाकरे यांनी नुकताच पक्षाचा झेंडा बदलला, 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदींना पाठींबा दिला तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा कडाडून विरोध केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदींचा विरोध केल्यानंतर राज ठाकरे यांनी केंद्राने पारीत केलेल्या CAA कायद्याला पाठींबा देत पुन्हा मोदी राग आवळला. कधी निवडणूक चिन्हाची दिशा बदलून पाहिली. मात्र, पक्षाची दशा काय बदलली नाही. इतक्या भूमिका बदलून ही पक्षाचा ग्राफ नेहमी उलट्या दिशेने जात राहीला. आता शॅडो कॅबिनेटची स्थापना केली आहे. यानंतर राज ठाकरे यांच्या सूर गवसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मनसेचं शॅडो कॅबिनेट…

गृह, विधी व न्याय : बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजीव नाईक, राजीव उंबरकर, अवधूत चव्हाण, राहुल बापट, प्रविण कदम, योगेश खैरे, माजी पोलिस अधिकारी बुद्धीवंत, प्रसाद सरफरे, डॉ. अनिल गजणे, Adv. रविंद्र पाष्टे, Adv. दिपीक शर्मा, Adv. जमाल देशपांडे

जलसंपदा, माहिती जनसंपर्क - अनिल शिदोरे

मराठी भाषा माहिती व तंत्रज्ञान : अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे, केतन जोशी

गृहनिर्माण, वित्त व नियोजन : नितीन सरदेसाई, वसंत फडके, मिलींद प्रधान, पियुष छेडा, प्रितेश बोऱ्हाडे, वल्हभ चितळे, पराग क्षित्रे, अनिल शिदोरी विशेष जबाबदारी वित्त व नियोजन

उद्योग : हेमंत संबूज विशिष्ट उद्योग

महसूल, परिवहन – अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर, अजय महाले, संदीप पाचंगे आणि श्रीधर जगताप

उर्जा : श्री सावंत, मंदार हळबे, सागर देव्हरे आणि विनय भोईटे

ग्रामविकास : जयप्रकाश बावीसकर, अमित ठाकरे, परेश चौधरी, प्रकाश भोईर आणि अनिल शिदोरे, सुरेश शिंदे

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन : संजय चित्रे, अमित ठाकरे, वाघेश सारस्वत, संतोष धुरी, आदित्य दामले आणि ललीत यावलकर

शालेय शिक्षण, उच्च तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण : अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर (उच्च शिक्षण), सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, बीपी नाईक आणि अमोल रोगे

कामगार - राजेंद्र वाघसकर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे

नगरविकास, पर्यटन : संदिप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुणकर, किर्तीकुमार शिंदे, उत्तम सांडव, हेमंत कदम, योगेश चिले, संदीप कुलकर्णी, फारुख डाला.

सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्य़ाण : रिटा गुप्ता, कुंदा राणी

सहकार आणि पणन : दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये, जयदेव कर्वे, वल्लभ चितळे

अन्न व नागरी पुरवठा : राजा चौगुले, महेश जाधव, वैभव माळवे, विशाल पिंगळे

मत्स विकास आणि बंदरे : परुशुराम उपरकर, जितू चव्हाण, निशांत गायकवाड

महिला व बालविकास : शालिनी ठाकरे, स्मीता चूरी

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) : योगेश परुळेकर, अभिषेक सप्रे, आणि सीमाताई शेवलकर

सार्वजनिक बांधकाम : (सार्वजिनिक उपक्रम) संजय शिरोडकर

रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन : बाळा शेडगे आणि आशिष कोरी

सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार : अमेय खोपकर, कृषी व दुग्ध विकास, संतोष नागरगोजे, संजीव पाखरे, अमर कदम,

कौशल्य विकास व उद्योजकता : स्नेहलताई जाधव

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, भटक्या जाती आणि कल्याण : गजानन काळे, Adv. संतोष सावंत, अनिल करपे,

ग्राहक संरक्षण : प्रमोद पाटील

राज्य उत्पादन शुल्क : वसंत फडके

आदिवासी विकास : आनंद येम्मडवार, किशोर जाचक, परेश चौधरी

पर्यावरण : रुपाली पाटीस, किर्ती कुमार शिंदे, जय श्रृंगारपुरे आणि देवव्रत पाटील

खार जमीनी, पुनर्विकास आणि भूकंप पुनर्वसन : अनिषाताई माजगावकर

पाणी पुरवठा आणि सार्वजिनिक स्वच्छता : अरविंद गावडे

क्रीडा व युवक कल्याण : विठ्ठल लोकणकर, अरुण जांभळे,

अल्पसंख्याक विकास आणि वक्फ : इरफान शेख, सैफ शेख, जालीम तडवी, जावेद शेख आणि अल्ताफ खान

Updated : 9 March 2020 11:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top