छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील केसमध्ये न्यायालयात काय घडले ?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 6 Sep 2024 11:02 AM GMT
X
X
SINDHUDURG | राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेतील शिल्पकार जयदीप आपटे आणि तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.ही घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
Updated : 6 Sep 2024 11:02 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire