Home > News Update > मुख्यमंत्री आज काय बोलणार?

मुख्यमंत्री आज काय बोलणार?

नवीन वर्ष आणि ख्रिसमस या सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लसीचे वितरणासाठी आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत.

मुख्यमंत्री आज काय बोलणार?
X

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपन्न झाले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत.

कोरोना आणि नववर्षाचं स्वागत यासोबतच नाताळ यासंदर्भात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काही नवी नियमावली जाहीर होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मेट्रो कारशेड हस्तांतरणावरुन विरोधक ठाकरे सरकारला घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आजच्या संवादामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना काय उत्तर देणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेड ची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केली होती.

मेट्रो कारशेड कांजूर मार्ग इथे उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3 चे कार शेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. राज्य सरकार याबाबत चाचपणी करत आहे. मेट्रो कार शेडबाबत कांजूर मार्ग येथील जागेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही राज्यात शनिवारी 74 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 3 हजार 940 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 119 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्या करोना बाधित रुग्णांची संख्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक असल्यानं ती काहीशी चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काय उपाय योजना करतयं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 20 Dec 2020 3:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top