Home > News Update > सोलापूरात फटाक्यांचा फॅक्टरीत भीषण स्फोट; पाच जणांचा मृत्यू

सोलापूरात फटाक्यांचा फॅक्टरीत भीषण स्फोट; पाच जणांचा मृत्यू

नवीन वर्षाच्या सुरवातीला नाशिक आणि सोलापूर येथे कारखान्याला भीषण आग लागली. हा स्फोट खुपच भयंकर होता. असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.

सोलापूरात फटाक्यांचा फॅक्टरीत भीषण स्फोट; पाच जणांचा मृत्यू
X

संपूर्ण जगात नवीन वर्षाचे स्वागत होत असताना, महाराष्ट्रात अत्यंत दोन दुर्देवी घटना घडल्या. नाशिक येथे जिंदाल कंपनीला लागलेली आग विझवण्याचे काम सुरु असताना सोलापूरात ही कंपनीचा स्फोट झाल्याचा धक्कादायक माहिती समोर आली. सोलापूर जिल्ह्यातील शिराळे-पांगरी या ठिकाणी दारु आणि फटाके बनवण्याचा कारखाना असल्याने दुपारी दोनच्या सुमारास या कारखानाला आग लागली. सुमारे १५ किलोमीटरपर्यंत स्फोट झाल्याचा आवाज ऐकायाला आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या स्फोटात २० ते २५ लोक जखमी झाले असून पाच जण मयत झाले आहेत.

अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच या कंपनीत ४० कर्मचारी काम करत होते. या कारखान्यात फटाके बनवण्यात येत असल्याने संबंधित कंपनीकडे परवाना होता का याची चौकशी देखील पोलिसांच्याकडून केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या देखील घटना स्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलातील जवानांना यश आले नाही.

Updated : 1 Jan 2023 12:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top