Top
Home > Max Political > जामीया मिलीया’ बद्दल काय म्हणाले अमित शहा

जामीया मिलीया’ बद्दल काय म्हणाले अमित शहा

जामीया मिलीया’ बद्दल काय म्हणाले अमित शहा
X

देशात नागरिकत्व सुधारणा विधेयका विरोधात आंदोलनं चालू आहेत. आजतक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत गृहमंत्री अमित शहा नागरिकत्व विधेयका विरोधात बोलताना म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी या विधेयकाचा व्यवस्थित अभ्यास केलेला नाही. त्यामुळे या विधेयकाचा अभ्यास व्यवस्थित करतील, तेव्हा आपोआप आंदोलनं कमी होण्यास मदत होईल.”

देशात एकूण २२ ते २३ विद्यापीठात आंदोलनं चालू आहेत. त्यापैंकी ५ ते ६ विद्यापीठातल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलंय. जामीया मिलीया विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या घटनेसंदर्भात विचारले असता, “ज्या ठिकाणी दगडफेक होत असेल आणि गाड्या थांबवून जाळल्या जात असतील त्या ठिकाणी पोलिसांनी अशाप्रकारे कारवाई केली असेल तर कारवाई योग्य आहे.”

जामीया मिलीयामध्ये जाण्यासाठी परवानगी घेतली की, नाही याचा विचार करण्यापेक्षा दिल्लीमध्ये सध्या शांतता कशाप्रकारे प्रस्थापित करता येईल याकडे लक्षं आहे. तसचं देशात राहणाऱ्या लोकांपैकी कोणाचंच नागरिकत्व जाणार नाही. फक्त देशाबाहेरील येणाऱ्या मुस्लिमेतर लोकांना हे विधेयक लागू आहे. त्याचप्रमाणे NRC सर्व धर्मांच्या नागरिकांना लागू आहे. कोणत्याही वैयक्तीक धर्मासाठी नसल्याचं अमित शहा यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.

Updated : 17 Dec 2019 5:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top