Home > News Update > विनेश फोगट व साक्षी मलिक यांचे ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप...

विनेश फोगट व साक्षी मलिक यांचे ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप...

विनेश फोगट व साक्षी मलिक यांचे ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप...
X

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat)आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) यांनी बुधवारी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (brij bhushan sharan singh) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. दिल्लीतील जंतरमंतरवर जवळपास 20 पैलवान ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. ब्रिजभूषण यांचा कारभार खेळाडूंच्या प्रगतीला अनुकूल नाही ते मनमानी कारभार करत असल्याचा सुद्धा आरोप आंदोलनकर्त्या पैलवानांनी केला आहे.

कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेत क्रीडा मंत्रालयाने कुस्ती संघटनेकडून ७२ तासांत उत्तर मागितले आहे. तसे न केल्यास कुस्ती संघटनेवर कारवाई केली जाणार असल्याचं म्हंटल आहे. मंत्रालयाने पुढील आदेश येईपर्यंत लखनौ येथे १८ जानेवारीपासून सुरू होणारे महिला कुस्ती शिबिरही रद्द केले आहे. या शिबिरात 41 महिला कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे की, शिबिरात पोहोचलेल्या महिला कुस्तीपटूंना तेथे राहण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात याव्यात. या सगळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू दिव्या काकरनने एक व्हिडिओ पोस्ट करून ब्रिजभूषण शरणला पाठिंबा दिला आहे.

आंदोलन करत खेळाडूंनी काय आरोप केले...?

विनेश फोगट यांनी बुधवारी धरणे आंदोलन करत म्हंटले आहे की, ब्रिजभूषण शरण सिंग, महिला कुस्तीपटूंचे अध्यक्ष आणि प्रशिक्षक राष्ट्रीय शिबिरांमध्ये लैंगिक छळ करतात. राष्ट्रीय शिबिरांमध्ये नियुक्त केलेले काही प्रशिक्षक वर्षानुवर्षे महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करत आहेत. अनेक महिला कुस्तीपटूंनीही याबाबत तक्रारी केल्या असल्याचं त्यांनी हंटल आहे. इतकाच नाही तर ब्रिजभूषण शरण सिंग यांनी १० ते २० छळ झालेल्या महिला कुस्तीपट्टूची नावे देखील माहित असून ती नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांना भेटून सांगणार असल्याचं विनेश फोगाट म्हणाली आहे.

विनेशचा आरोप - जीवे मारण्याची धमकी दिली

टोकियो ऑलिम्पिकमधील पराभवानंतर WFI अध्यक्षांनी मला 'खोटे नाणे' म्हटले होते. मानसिक छळ केला. मी रोज आयुष्य संपवण्याचा विचार करायचो. कोणत्याही कुस्तीपटूला काही झाले तर त्याची जबाबदारी ब्रिजभूषण शरण सिंग यांची असेल. आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आम्हाला काही झाले तर त्याला अध्यक्ष जबाबदार असतील. आमचे करिअर पणाला लावून आम्ही इथे धरणे धरून बसलो असल्याचा गंभीर आरोप विनेश फोगाट म्हणाली आहे.

आरोपात तथ्य नाही - ब्रिजभूषण शरण सिंग

या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे ब्रिजभूषण शरण सिंग यांनी म्हंटले आहे. हे आरोप सिद्ध झाल्यास फाशीवर जाण्यासाठी तयार आहे. विनेशने आत्ताच आरोप का केले? तेव्हाच ती पंतप्रधान, क्रीडा मंत्रालय किंवा पोलिसांकडे का गेली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे...

Updated : 19 Jan 2023 7:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top