महाविकास आघाडी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. मात्र, इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयावरुन अजूनही वाद कायम आहे.
माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी इंदू मिल संदर्भात भाजपने जे काम केलं ते आत्तापर्यंत कोणी केलं नाही. असा दावा केला आहे. ते मॅक्समहाराष्ट्र चा विशेष कार्यक्रम ‘बिटवीन द लाईन’ मध्ये बोलत आहे.
मागच्या १२ वर्षांपासून लोकांनी आंदोलने केली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार होते. मात्र, तेव्हा त्यांनी जागा दिली नाही. असा दावा माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमात केला आहे.
Updated : 7 Feb 2020 1:01 PM GMT
Next Story