Home > News Update > पतंग कधी कापायचा आम्हाला माहिती आहे... मुख्यमंत्र्यांच्या `आजी-माजी-भावी` संजय राऊतांची प्रतिक्रीया

पतंग कधी कापायचा आम्हाला माहिती आहे... मुख्यमंत्र्यांच्या `आजी-माजी-भावी` संजय राऊतांची प्रतिक्रीया

``ज्यांना पतंग उडवायचीयं, त्यांनी उडवावी. कुणाची पतंग कधी कापायची, आम्हाला समजतं.मुख्यमंत्री ठाकरे यांची एक भाषण करण्याची स्टाईल आहे. त्या पद्धतीने त्यांनी हे भाषण केलं आहे. त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की नवीन आघाडी होईल.सरकार ५ वर्ष चालवायची कमिटमेंट आहे. शिवसेना शब्दांची पक्की असते. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही, शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. आम्ही सगळे त्याच मार्गाने चालतो. हे सरकार पडेल, या भ्रमात कुणी राहू नये, अशा शब्दात खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या `आजी-माजी-भावी` वक्तव्यावर प्रतिक्रीया दिली आहे.

पतंग कधी कापायचा आम्हाला माहिती आहे... मुख्यमंत्र्यांच्या `आजी-माजी-भावी` संजय राऊतांची प्रतिक्रीया
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. एका जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर बसलेले रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे बघून त्यांनी "आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी", असा उल्लेख केल्यानंतर पुन्हा शिवसेना-भाजपा युती होणार का? अशी चर्चा सुरु झाली होती.

मुख्यमंत्री ठाकरे यांची एक भाषण करण्याची स्टाईल आहे. त्या पद्धतीने त्यांनी हे भाषण केलं आहे. त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की नवीन आघाडी होईल, आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ज्यांना भावी सहकारी व्हायचंय, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले की आम्हाला माजी म्हणून नका, त्या याचबाबतच्या हालचाली आहेत. कुणीतरी तिकडे आहेत, ज्यांना इकडे यायचंय. त्यांच्यासाठी उद्धवजींनी संकेत दिलेत की तुम्ही या, असं संजय राऊत यांनी आज पत्रकार परीषदेत स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यावरुन भाजपकडून सकारात्मक प्रतिक्रीया येत असताना संजय राऊत यांनी भाजपवर प्रखर शब्दात टीका केली आहे.ते म्हणाले, ज्या पक्षातल्या लोकांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द काढले, ज्या पक्षातले मंत्री कानाखाली मारण्याची भाषा करतात, ही जी नवीन संस्कृती समोर आली आहे, अशा पक्षांशी आम्ही हातमिळवणी कशी करू शकतो?", असा उलट सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

"एमआयएमसारख्या पक्षांना रोखण्यासाठी महाविकासआघाडी समर्थ आहोत. तसं नसतं, तर दोन वर्ष सरकार सुरळीत चाललंच नसतं. तिन्ही पक्षांमध्ये सरकार चालवण्याविषयी कोणतेही मतभेद नाहीत. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालवलं जातंय. पुढची तीन वर्ष गतिमान पद्धतीने सरकार चालेल याविषयी विरोधी पक्षांनी खात्री बाळगावी. ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही गुडघे टेकून सरेंडर होऊ, त्यांना हवं ते करू, हा कचरा जर कुणाच्या डोक्यात असेल, तर तो कचरा तसाच ठेवा, आम्ही झुकणार नाही", अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.

Updated : 18 Sep 2021 6:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top