Home > News Update > वर्धा जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर - जिल्हाधिकारी

वर्धा जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर - जिल्हाधिकारी

वर्धा जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर - जिल्हाधिकारी
X

वर्धा जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आला आहे , त्यामुळे वर्धेतील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी होणाऱ्या गर्दीला आळा घाला अन्यथा लवकरच लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे सर्वांनी कोरोनाच्या नियमाचे पालन करावे तसेच धार्मिक सण उत्सवाला कमीत कमी गर्दी करावी, मास्क न वापरणाऱ्यावर प्रशासनाची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे. पत्रकर परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत, तसेच जिल्ह्यात धार्मिक सण उत्सव सुरू झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे. परिणामी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाजारातील व्यापाऱ्यांनी होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच नागरिकांनी अत्यंत साध्या पद्धतीने धार्मिक सण उत्सव साजरे करावे व गर्दी टाळावी अशी सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी केली आहे.

Updated : 15 Sep 2021 1:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top