Municipal Elections in Maharashtra : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू
X
Municipal Elections in Maharashtra आज १५ जानेवारी २०२६ म्हणजेच मतदानाचा दिवस... राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान सुरू झाले आहे. ही निवडणूक राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, विशेषतः मुंबईसह इतर प्रमुख शहरांमध्ये. आज सकाळी ७.३० वाजेपासून सुरू झालेले मतदान संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू असणारेय. राज्यातील २९ महापालिकांमध्ये एकूण २,८६९ जागांसाठी सुमारे १५,९३१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या २२७ जागांसाठी सुमारे १,७०० उमेदवार आहेत. तब्बल ३.४८ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मुंबईत (BMC) महायुती ( BJP Shivsena भाजप-एकनाथ शिंदे गट शिवसेना) विरुद्ध ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. ही निवडणूक २०१७ नंतर पहिल्यांदाच होत असून, शिवसेना फुटी नंतरची पहिली मोठी निवडणुक आहे. पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) आदी प्रमुख महापालिकांमध्येही मतदान सुरू आहे. मतमोजणी उद्या १६ जानेवारी २०२६ रोजी होईल आणि निकाल जाहीर होतील. राज्यभरात कडक सुरक्षा व्यवस्था असून, मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकांमुळे आज (१५ जानेवारी) सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
ही निवडणूक राज्यातील सत्तासंघर्ष आणि स्थानिक मुद्द्यांवर आधारित असून, मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन सर्वच पक्षांकडून करण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून, काही ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे.
राज्यातील २९ महानगपालिका
बृहन्मुंबई महानगरपालिका (मुंबई)
ठाणे महानगरपालिका
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका
नवी मुंबई महानगरपालिका
उल्हासनगर महानगरपालिका
मीरा–भाईंदर महानगरपालिका
वसई–विरार महानगरपालिका
पुणे महानगरपालिका
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका
नाशिक महानगरपालिका
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिका
सोलापूर महानगरपालिका
कोल्हापूर महानगरपालिका
सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका
नागपूर महानगरपालिका
अमरावती महानगरपालिका
अकोला महानगरपालिका
लातूर महानगरपालिका
नांदेड–वाघाळा महानगरपालिका
परभणी महानगरपालिका
बीड महानगरपालिका
जळगाव महानगरपालिका
धुळे महानगरपालिका
अहमदनगर (अहिल्यानगर) महानगरपालिका
चंद्रपूर महानगरपालिका
गोंदिया महानगरपालिका
यवतमाळ महानगरपालिका
पनवेल महानगरपालिका
सातारा महानगरपालिका






