Home > News Update > नागपूर विधान परिषदेच्या जागेसाठी आज मतदान ; बावनकुळे आणि देशमुख आमनेसामने

नागपूर विधान परिषदेच्या जागेसाठी आज मतदान ; बावनकुळे आणि देशमुख आमनेसामने

नागपूर विधान परिषदेच्या जागेसाठी आज मतदान ; बावनकुळे आणि देशमुख आमनेसामने
X

नागपूर // महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. काँग्रेसने शेवटच्या क्षणाला आपले अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिले. त्यामुळे या निवडणुकीला एक नवा ट्विस्ट आला आहे. तर भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे निवडणुक रिंगणात आहेत. या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 559 आहे. यात महानगरपालिका 155, जिल्हा परिषद 70, नगरपरिषद आणि नगरपंचायत 334 अशी मतदार संख्या आहे.

मतदारांसाठी दोनच ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत . नागपूर शहरातील तीन मतदान केंद्र आणि ग्रामीण भागातील 12 अशा एकूण 15 केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते 4 असणार आहे. मतदारांसाठी दोनच ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. एक म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाने निर्गमित केलेले मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा मतदार ज्या स्थानिक प्राधिकारी संस्थेचा सदस्य असेल त्या स्थानिक प्राधिकारी संस्थेने निर्गमित केलेले ओळखपत्र. याशिवाय अन्य कोणताही पुरावा ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही.

दरम्यान , मतदान करताना मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. १,२,३ किंवा 1,2,3 किंवा I,॥, III अशा आकड्यांमध्ये आपला पसंती क्रमांक दर्शविणे आवश्यक आहे. शब्दांत पसंती क्रमांक नोंदविता येणार नाही. मतदान केंद्रांत मोबाईल, स्पाय कॅमेरा, स्पाय पेन, कॅमेरा, टॅब, तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. एकूण 15 मतदान पथके यासाठी कार्य करणार आहेत.

Updated : 10 Dec 2021 3:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top