Home > News Update > विशाल सुरेश हंबीरने गाठले डोंगरकड्यातून आयआयटी चेन्नईचे ध्येय

विशाल सुरेश हंबीरने गाठले डोंगरकड्यातून आयआयटी चेन्नईचे ध्येय

विशाल सुरेश हंबीरने गाठले डोंगरकड्यातून आयआयटी चेन्नईचे ध्येय
X

अहमदनगर : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील अतिदुर्गम आदिवासी भागातील पांजरे गावच्या विशाल सुरेश हंबीर मुलाने डोंगरकड्यातून आयआयटी चेन्नईचा ध्येय गाठलं आहे. विशालने अभ्यासासाठी ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता, नेटवर्कसाठी डोंगर कपारींची मदत घेत अभ्यास केला . परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आणि त्याची चेन्नई येथे आय आय टी ला मॅकेनिकल विभागात त्याची निवड झाली. त्याच्या या निवडीबद्दल भंडारदरा परीसरातून अभिनंदन होत आहे.

विशाल सुरेश हंबीरचे प्राथमिक शिक्षण शेंडीच्या जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत झाले, तर सहावी मध्ये असताना त्याची टाकळी ढोकेश्वर येथे निवड झाली.दहावी पर्यंत टाकळी ढोकश्वर येथे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर राजस्थान मधील दाक्षिणा या संस्थेमार्फत बुंदी येथे पुढील शिक्षणासाठी त्याची निवड झाली. इयत्ता १२ वी विशाल उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची आयआयटी मॅकेनिकल विभागात शिक्षण पुर्ण करण्याची इच्छा होती .पंरतु त्यासाठी जेईई मेन व जेईइ एडव्हाॅन्स या दोन परिक्षेचा प्रमुख अडथळा होता. त्यातच कोरोनामुळे विशालला बराच काळ घरीच काढावा लागला.

त्यातच पांजरे हे गाव अतिदुर्गम डोंगराळ भागात असल्याने त्याला इंटरनेटची समस्या होत होती. त्याठिकाणी बीएसएनएल ची सेवा असतानाही केवळ तो ज्या परीसरात राहत होता तिथे सेवेत सातत्य नसल्याने विशाल घरापासुन डोंगरावर दोन किमीपर्यंत नेटवर्क शोधण्यासाठी जावं लागयचं.त्यातच त्याला स्वतःचा मोबाईल नसल्याने त्याला भावाच्या मोबाईलचा आधार घ्यावा लागला.ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता तो अभ्यास करतच राहीला आणि त्याला अखेर यश मिळाले. जेई मेन व जेई ॲडव्हाॅन्स परिक्षा सहजगत्या त्याने पास केल्या. त्या जोरावर त्याची निवड चेन्नई येथे आयआयटी मॅकेनिकल शिक्षणासाठी निवड झाली आहे.

विशालची आता आयआयटी क्षेत्रात भरारी मारुन युपीएसी परिक्षेत घवघवीत यश मिळविण्याची इच्छा आहे. आदिवासी विभागातून आयआयटी क्षेत्रात अभ्यासासाठी निवड होणारा विशाल हा पहिला विद्यार्थी ठरला आहे.

याबाबत विशालचे वडील सुरेश हंबीर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, माझ्या मुलाची चेन्नई येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाल्याने माझ्यासाठी निश्चिततच ही अभिमानाची बाब आहे.पंरतु आमच्या डोंगराळ भागात नेटवर्क नसल्याने आमचे अनेक आदिवासी विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणासाठी मुकले आहेत.शासनाने याची दखल घ्यावी व नेटवर्क उपलब्ध करुन द्यावे, मागणी त्यांनी केली आहे.

Updated : 30 Nov 2021 6:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top