Viral Video : जेव्हा सामान्य माणसाच्या संतापाचा उद्रेक होतो...
कोविडने मारायचं की निर्बंधांमुळे उपाशी राहून मरायचं, सांगा नेमकं जगायचं कसं... हा सवाल एका तरुणाने व्यवस्थेला विचारला आहे.
X
कल्याण तालुक्यातील प्रेम सुरवसे या तरुणाने हा सवाल सरकारला केला आहे. जवळपास गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनामुळे अनेक जणांची नोकरी गेली, नातेवाईक गेले, लाखो लोक देशोधडीला लागले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने अनेक निर्बंध लादले खरे, पण पोटातली आग विझविण्यासाठी लाखो लोकांना बाहेर पडावेच लागते आहे.
लोकल प्रवासावर मुंबईत निर्बंध असल्याने खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना नोकरीसाठी जाणे शक्य होत नाहीये. पण ऑफिसला गेले नाही तर नोकरी जाण्याची भीती असल्याने तिकीट मिळत नसले तरी अनेकजण लोकलने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. परळ स्टेशनवर अशाच प्रकारे एका तरुणाला टीसीने पकडल्यानंतर त्याला दंड झाला. पण यावेळी त्याने एक व्हिडिओ तयार केला आणि सरकारला काही मुलभूत प्रश्न विचारले.
निर्लज्जपणे सामोरे जातो पण त परळ स्थानकातील अश्याच एका तरुणाचा भावनावश करणारा व्हिडिओ सध्या प्रत्येकालाच अंतर्मणा डोकावण्यास भाग पडतोय






