Home > News Update > विनायक मेटेंच्या पत्नीने सोडलं मौन, अपघाताच्या चौकशीची मागणी

विनायक मेटेंच्या पत्नीने सोडलं मौन, अपघाताच्या चौकशीची मागणी

विनायक मेटेंच्या पत्नीने सोडलं मौन, अपघाताच्या चौकशीची मागणी
X

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या अपघातामागे घातपात आहे का याची चौकशी करण्याची मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. पण आता मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी देखील याबाबत आपले मौन सोडले आहे.

विनायक मेटे यांच्या अपघाता संदर्भात स्थानिक पत्रकार आणि विनायक मेटे यांचे ड्रायव्हर अण्णासाहेब मायकर यांचे एक कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाले आहे. या कॉल रेकॉर्डिंगमुळे विनायक मेटे यांच्या जीवाला धोका होता आणि अपघातमागे घातपात आहे का, अशी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना पत्रकारांनी विचारले असता "ही क्लिप मी आत्ताच ऐकलेली आहे. अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझे देखील बोलणं झाले आहे. त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. तीन ऑगस्टला असाच प्रकार घडल्याचे देखील अण्णासाहेब यांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, मला देखील यामध्ये संशय वाटतो आहे." असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

विनायक मेटे यांचे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातात दरम्यान निधन झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी यामागे घातपात असल्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे त्यांचे ड्रायव्हर अण्णासाहेब मायकर यांनीही ३ तारखेला विनायक मेटे यांच्या गाडीला घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप केला आहे. त्यामुळे विनायक मेटे यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती का, त्यांचा कुणी पाठलाग करत होते का आणि त्यांना घातपाताने मारण्यात आले का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Updated : 16 Aug 2022 6:41 AM GMT
Next Story
Share it
Top