Home > News Update > काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्ष नेते पदावर शिक्कामोर्तब

काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्ष नेते पदावर शिक्कामोर्तब

काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्ष नेते पदावर शिक्कामोर्तब
X

काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या विरोधी पक्ष नेते पदावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काँग्रेसने पुढाकार घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय काँग्रेस हायकमांडकडे अडकला होता. यावर आता काँग्रेस ने निर्णय घेत अखेर विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेता बनवण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसला विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद मिळणार यावरती शिक्कामोर्तब झालं. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्याला विरोधी पक्षनेता करण्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर दुसऱ्या फळीतील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यात संग्राम थोपटे यांनी 30 आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिल्लीमध्ये पाठवलं. त्यामुळे आमदारांच समर्थन लक्षात घ्यायच की आणखी काही निर्णय घ्यायचा हा प्रश्न निर्माण होता. परंतु अखेर वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Updated : 2 Aug 2023 8:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top