Home > News Update > Fact Check: 'अल्ला हू अकबर' राकेश टिकैत यांच्या घोषणा आणि सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्याची सत्यता काय?

Fact Check: 'अल्ला हू अकबर' राकेश टिकैत यांच्या घोषणा आणि सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्याची सत्यता काय?

Fact Check: 'अल्ला हू अकबर' राकेश टिकैत यांच्या घोषणा आणि सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्याची सत्यता काय?

Fact Check: अल्ला हू अकबर राकेश टिकैत यांच्या घोषणा आणि सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्याची सत्यता काय?
X

सध्या सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओची सत्यता न तपासता अनेक लोक ते तसेच फॉरवर्ड देखील करत आहेत.

शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी रविवारी मुझफ्फरनगरमध्ये 'किसान महापंचायती' मध्ये केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात लाखो शेतकऱ्यांना संबोधित केले आहे. या सभेतली राकेश टिकैत यांच्या भाषणाचा एक भाग मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे.

भाजपच्या अनेक सदस्यांनी आणि समर्थकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओत राकेश टिकैत 'अल्ला हू अकबर' म्हणत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना भाजपचे दिल्ली प्रवक्ते निगहट अब्बास यांनी, " राकेश टिकैत उत्तर प्रदेश निवडणूक लढत आहेत."भाजपच्या सदस्या प्रीती गांधी यांनीही राकेश टिकैतचा व्हिडिओ शेअर केला आहे.दरम्यान शेफाली वैद्य यांनी देखील हे ट्वीट केलं आहे.

असाच दावा करणारे अनेक पोस्ट

@AMIT_GUJJU, @idesibanda, @erbmjha, @seriousfunnyguy, @socialtamasha, @soulefacts, @pujatiwariBJP, @Sachi_Sandhna आणि @atulahuja या अकांउटवरून देखील करण्यात आल्या आहेत.

काय आहे सत्य?

नक्की काय म्हटलं होतं राकेश टिकैत यांनी?

" पीएम मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्याला तोडण्याचे काम करतील, आपण जोडण्याचे काम करू," 'बोले सो निहाल ... सत श्री अकाल' च्या घोषणांदरम्यान टिकैत म्हणाले. आम्ही अशी प्रतिज्ञा घेतो की आमच्या कबरी तिथे बांधल्या गेल्या तरी आम्ही मोर्चा सोडणार नाही. जर आम्हाला शहीद व्हायचे असेल तर आम्ही मोर्चांवर होऊ. परंतु जिंकल्याशिवाय परत येणार नाही. "

ते पुढे म्हणाले, "जर अशी सरकारे देशात असतील तर ती दंगली घडवण्याचे काम करेल. यापूर्वी देखील (त्यांचे वडील आणि माजी बीकेयू अध्यक्ष महेंद्रसिंह टिकैत यांचा संदर्भ देतात) जेव्हा टिकैत साहेब येथे होते तेव्हा घोषणाबाजी करण्यात आली.

'अल्लाह हू अकबर' (जमाव 'हर हर महादेव' चा जप करतो) 'अल्लाह हू अकबर' (जमाव 'हर हर महादेव' चा जप करतो). या पृथ्वीतलावावर 'अल्ला हू अकबर' आणि 'हर हर महादेव' च्या घोषणा दिल्या गेल्या. या घोषणा नेहमी दिल्या जातील. दंगल येथे होणार नाही. ते तोडण्याचे काम करतील, आम्ही जोडण्याचे काम करू.

भाषणाच्या या भागाला खाली दिलेल्या व्हिडिओत पाहू शकता 10 मिनट 36 सेकेंदा नंतर पाहा.

राकेश टिकैत म्हणाले की महेंद्रसिंह टिकैतच्या काळापासून शेतकरी चळवळीने दोन्ही घोषणांचा वापर धार्मिक सलोख्याचे प्रतीक म्हणून केला आहे.

निष्कर्श:

'अल्लाह हू अकबर' अर्थात 'ईश्वरापेक्षा कोणीही मोठा नाही' या केवळ उच्चाराने राकेश टिकैत मुस्लिम तुष्टीकरणाचा अवलंब करत होते. असा खोटा दावा भाजप समर्थकांकडून केला जात आहे. राकेश टिकैत या व्हिडीओमधून हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश देत आहेत.

या संदर्भात AltNews ने Fact Check केलं आहे. https://www.altnews.in/video-of-rakesh-tikait-uttering-allah-hu-akbar-viral-with-misleading-narrative/


राकेश टिकैत, शेतकरी आंदोलन, किसान महापंचायत, उत्तर प्रदेश निवडणूक

Updated : 9 Sep 2021 6:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top