Home > News Update > विदर्भ कुटूंब स्नेहमीलन मेळावा रविवारी

विदर्भ कुटूंब स्नेहमीलन मेळावा रविवारी

विदर्भ कुटूंब स्नेहमीलन मेळावा रविवारी
X

नवी मुंबईतखारघरमध्ये पहिल्यांदाच रंगणार वैदर्भियांचा सोहळा रंगणार आहे. रायगड जिल्हा आणि नवी मुंबई परिसरात राहणा-या वैदर्भियांच्या 'आपला विदर्भ' या संघटनेतर्फे येत्या रविवारी २२ जानेवारीस 'विदर्भ कुटूंब स्नेहमीलन' कार्यक्रम खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकूचा कार्यक्रमही होणार आहे.

वैदर्भीय संस्कृती, साहित्य यांचे संवर्धन आणि आपपापल्या गावांपासून शेकडो किलोमीटर दूर येऊन राहणा-या वैदर्भियांना एकमेकांची साथ-सोबत लाभावी या हेतूने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.

येत्या रविवारी २२ जानेवारीस खारघरमधील सेक्टर १२ येथे एमटीडीसी रेसिडेन्सी येथे संध्याकाळी ६ ते रात्री १० काळात हा स्नेहमीलन सोहळा पार पडणार आहे. यात सदस्यांचा परिचय, बाळगोपाळांसाठी खास स्पर्धा तसेच सदस्यांना गायन, नृत्य, वादन आदी, कला सादर करण्याची संधीही दिली जाणार आहे.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी समन्वयक विजय कुमार कोहाड- ९९६९२ ३८१५० आणि अश्विनी हडपे- ८३२९९३७१९७ यांना संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.

Updated : 21 Jan 2023 5:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top