Home > News Update > ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे याचं निधन

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे याचं निधन

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे याचं निधन
X

ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महत्त्वाचे शिलेदार राहिलेले पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिनाभरापूर्वीच त्यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर रणदिवे यांचीही प्रकृती खालावली होती. त्यातून ते सावरले नाहीत.

दिनू रणदिवे यांनी गोवा मुक्ती लढ्यात सक्रीय सहभाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे व कॉम्रेड डांगे यांच्यासोबत त्यांनी कारावास भोगला होता.

संयुक्त महाराष्ट्र समितीने 'संयुक्त महाराष्ट्र पत्रिका' नावाचे अनियतकालिक सुरु केले होते. दिनू रणदिवेंनी पत्रकार म्हणून कारकीर्दीची इथूनच सुरुवात केली. मुंबईतील रेल्वे कर्मचार्‍यांचा संप, गिरणगावातील कामगारांच्या लढ्याला रणदिवे यांनी साथ दिली. आयुष्यभर त्यांनी कष्टकरी, वंचित, शोषित समाज घटकांच्या हितासाठी पत्रकारिता केली.

Updated : 16 Jun 2020 9:26 AM GMT
Next Story
Share it
Top