Home > News Update > मंत्रालयात मंत्री उपस्थित नसतात, शिवसेनेच्या आमदाराचा घरचा आहेर

मंत्रालयात मंत्री उपस्थित नसतात, शिवसेनेच्या आमदाराचा घरचा आहेर

मंत्रालयात मंत्री उपस्थित नसतात, शिवसेनेच्या आमदाराचा घरचा आहेर
X

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव हजर राहिलेले नाहीत. यावरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत. त्याआधी देखील मंत्रालयात मंत्री उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत होत्या. आता तर विधिमंडळ अधिवेशनात भाजपच्या आमदारानेच नाराजी व्यक्त करत मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल यांनी मंत्री भेटत नसल्याची तक्रार केली. त्याचवेळी त्यांनी अजित पवार दर बुधवारी दिवसभर सगळ्यांना भेटतात, मग इतर मंत्र्यांना ते का जमत नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच दर आठवड्याला सर्व मंत्र्यांनी किमान एक मंत्रालयात उपस्थित राहावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच ही आपली एकट्याची नाही तर सर्व लोकप्रतिनिधींच्या मनातील भावना आहे, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या २ वर्षात विविध ठिकाणचे लोकप्रतिनिधी दर बुधवारी मुंबईत मंत्रालयात आपल्या मतदारसंघातील प्रश्न घेऊन येतात. पण लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निवदेनांची किंवा त्यांनी दिलेल्या पत्रांबाबत काय कार्यवाही झाली याची माहिती मिळण्याची कोणतीही सोय नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दर बुधवारी मंत्रालयात काही मोदके मंत्री दिसतात, लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचा संपर्क होणार नसेल तर काय करावं? कोरोनाचे संकट आहे हे आपण समजून घेऊ शकतो पण अजित पवार कसे काय रोज मंत्रालयात दिवसभर थांबतात, लोकांना भेटतात, असे सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Updated : 24 Dec 2021 2:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top