Home > News Update > "मी पट्टीचा गारुडी, योग्यवेळी सगळी गाणी वाजणार," वसंत मोरेंचा सूचक इशारा

"मी पट्टीचा गारुडी, योग्यवेळी सगळी गाणी वाजणार," वसंत मोरेंचा सूचक इशारा

मी पट्टीचा गारुडी, योग्यवेळी सगळी गाणी वाजणार, वसंत मोरेंचा सूचक इशारा
X

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राज्याच्या राजकारणात वारे वाहायला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा देखील सुरू आहे. तर आगामी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उतरण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. मनसेतंही इच्छुकांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. पुण्यातून मनसे नेते, वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी "साईनाथ बाबर दिल्लीत गेले, तर दुधात साखर पडेल," असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे वसंत मोरेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा सद्या सुरू आहे.

मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंच वक्तव्य

मनसे नेते वसंत मोरे ( Vasant More ) यांनी पुण्यात बॅनरबाजी करून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं अनेकदा दाखवून दिलं आहे. परंतू मंगळवारी पुण्यातील एका कार्यक्रमास शर्मिला ठाकरे ( Sharmila Thackeray ) उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी "साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पाहायचं आहे" असं वक्तव्य केलं. "त्यांना महापालिकेत पाठवायचं नाही. दिल्लीत पाठवलं, तर दुधात साखर पडेल," असं विधान शर्मिला ठाकरेंनी यांनी केल्याने साईनाथ बाबर ( Sainath Babar ) यांच्या लोकसभेचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. परंतू या वक्तव्या मुळे वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे


वसंत मोरे यांच सूचक स्टेटस

वसंत मोरे यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक सूचक स्टेटस ठेवलं आहे. "कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच. पण, मी पट्टीचा गारुडी आहे. योग्यवेळी सगळी गाणी वाजणार," असा सूचक इशारा स्टेटसमधून वसंत मोरेंनी दिला आहे. या स्टेटसमुळे मोरे नाराज असल्याचं दिसून येतेय. तर वसंत मोरेंचा नेमका रोष कोणावर आहे, असा सवाल या स्टेटसनंतर उपस्थित झाला आहे.





Updated : 8 Feb 2024 6:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top