Home > News Update > पालघर जिल्हा परिषदेसाठी  7 जानेवारीला मतदान

पालघर जिल्हा परिषदेसाठी  7 जानेवारीला मतदान

पालघर जिल्हा परिषदेसाठी  7 जानेवारीला मतदान
X

पालघर(palghar) जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

शमदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 18 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 22 डिसेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्‌टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 24 डिसेंबर 2019 रोजी होईल.

अपील नसल्यास 30 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी मागे घेता येईल. अपील असलेल्या ठिकाणी 1 जानेवारी 2020 रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

हे ही वाचा...

महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार.

डॉ. श्रीराम लागू काळाच्या पड्याआड

विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना न्याय मिळणार कधी?

पालघर जिल्हा परिषदेंतर्गत तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 57 जागांसाठी ही निवडणूक होत असून 29 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी निवडणूक होईल. त्यातील 57 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, असेही मदान यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम

• नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019

• नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019

• अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019

• अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020

• मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020

• मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020

Updated : 18 Dec 2019 3:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top