Home > News Update > Dnyanvapi case : 'शिवलिंगा'चे कार्बन डेटिंग होणार की नाही, कोर्टात आज फैसला

Dnyanvapi case : 'शिवलिंगा'चे कार्बन डेटिंग होणार की नाही, कोर्टात आज फैसला

ज्ञानवापी मशिदीच्या (Dnyanvapi Mosque) सर्वेक्षणात सापडलेल्या कथित 'शिवलिंगा'ची कार्बन डेटिंग करण्याबाबत आज वाराणसी सत्र न्यायालयात निर्णय देणार आहे. त्यामुळे याकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे.

Dnyanvapi case : शिवलिंगाचे कार्बन डेटिंग होणार की नाही, कोर्टात आज फैसला
X

ज्ञानवापी सर्वेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा करत चार महिलांनी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात न्यायालय 11 ऑक्टोबर रोजी निर्णय देणार होते. मात्र तो निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. त्यानुसार शिवलिंगाची कार्बन डेटिंग करायची की नाही? याबाबत निर्णय होणार आहे.

कार्बन डेटिंग म्हणजे काय? (What is Carbon Dating)

कार्बन डेटिंग म्हणजे एखाद्या वस्तूचं वय शोधणे...

कार्बन डेटिंग करताना कार्बनच्या C-14 या समस्थानिकाचा विचार केला जातो. त्यांचं अणू वस्तुमान हे 14 इतकं असतं. त्यामुळे हे समस्थानिक रेडिओएक्टिव्ह असते आणि जशी जशी वस्तू नष्ठ होते. त्यानुसार हा कार्बनही कमी होतो. त्यावरून एखाद्या वस्तूचं (धातूचं) किंवा सजीवाचं वय ठरवलं जातं. मात्र शिवलिंग हा दगड आहे. दगडामध्ये कार्बन नसतो. त्यामुळे दगडाचं कार्बन डेटिंग करणं शक्य नाही. मात्र शिवलिंग स्थापन करताना धातूचा वापर केला जातो. यावरून वय ठरवणे शक्य होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

काय आहे प्रकरण?

वाराणसी येथील शंकराच्या मंदीराशेजारी एक ज्ञानव्यापी मशीद आहे. या मशिदीच्या आत श्रृंगार गौरीची पूजा करण्यास परवानगी देण्यासाठी 5 हिंदू महिलांनी एक याचिका दाखल केली आहे. या मशिदीच्या अंजुमन इंतजामिया कमेटीने या महिलेच्या याचिकेला आव्हान दिले होते. मात्र, समितीने न्यायालयात प्रार्थनास्थळ कायदा, 1991 चा संदर्भ देत यावर सुनावणी घेण्यास विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी घेण्यास परवानगी दिल्याने सध्या यावर सुनावणी सुरू आहे.

Updated : 14 Oct 2022 6:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top