Home > News Update > प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून लढावं ; राऊतांच्या वक्तव्यावर वंचितचा सल्ला

प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून लढावं ; राऊतांच्या वक्तव्यावर वंचितचा सल्ला

प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून लढावं ; राऊतांच्या वक्तव्यावर वंचितचा सल्ला
X

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सामील करून घेण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षा कडून सातत्याने प्रयत्न चालू आहेत असे सांगितल जाते. संविधान वाचवण्यासाठी जो कॉँग्रेस सोबत यायला तयार आहे आम्ही त्यांनासोबत घेऊ असे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार बोलतांना दिसतात. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ही वंचित बद्दल सकारात्मक भुमिका घेतांना पाहायला मिळत आहेत. पण या केवळ चर्चाच राहतील की तोंडावर आलेल्या निवडणुकांमध्ये सोबत येतील हे मात्र आज दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकित स्पष्ट होईल. इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा सन्मान होणार, असं संजय राऊत वारंवार म्हणतात. आता तर प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून लढावं अस सूचक विधानही संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केल आहे.

वंचितचा राऊतांना सल्ला

'प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून लढावं' राऊतांच्या या विधानावर वंचित बहुजन आघाडी प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी समाजमध्यमांवर आपला व्हिडिओ शेअर करत खासदार संजय राऊत यांना सल्ला दिला आहे. ते म्हणतात वंचितच्या आघाडीतील समावेशाच्या मूळ मुद्द्याला संजय राऊत बगल देत आहेत. केवळ अकोला अकोला करत असल्याचे माध्यमांमधून दिसून येत आहे. वंचित आणि शिवसेना हे युतीमध्ये आहेत. 24-24 चा फॉर्मुला ठरलेला आहे. त्यामुळे हवं तर अकोल्याची जागा संजय राऊत यांनी लढवावी, असा सल्ला वंचित प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंनी खासदार संजय राऊत यांना दिला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं जागा वाटपाचं काही ठरलंय का? ठरलं नसेल तर का ठरत नाहीये? आणि काँग्रेस तुम्हाला सोबत घेणार आहे का? या बाबतीतल प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्टीकरण ही मागितले आहे.

Updated : 9 Jan 2024 9:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top