Home > News Update > गायरान जमिनीसाठी वंचित काढणार मोर्चा

गायरान जमिनीसाठी वंचित काढणार मोर्चा

सरकारने गायरान अतिक्रमीत नागरिकांना काढलेल्या नोटीसांविरुद्ध वंचित बहुजन आघाडीने मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे.

गायरान जमिनीसाठी वंचित काढणार मोर्चा
X

राज्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमण धारकांना सरकारने नोटीस (gairan land notice )बजावल्या आहेत. या नोटिसांना कायदेशीर उत्तर देण्यासाठी तसेच गायरान जमिनीचे अतिक्रमीत पट्टे नावावर होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने अॅड. बाळासाहेब आंबेडकर ( Adv Balasaheb Ambedakar) यांच्या नेतृत्वात २० जुलै ला मुंबई येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांनी दिली.




राज्यातील ३५८ तालुक्यातील २ लाख ४७ हजार अतिक्रमण धारकांना सरकारने नोटीस काढल्या असून या क्षेत्रात भटके विमुक्त तसेच अनेक गोरगरीब नागरिकांची घरे व जमिनी आहेत. (Gairan Land Maharashtra)सरकारच्या धोरणामुळे या नागरिकांना बेघर व्हावे लागण्याची भीती आहे. गायरान धारकांच्या या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी(Vanchit Bahujan Aghadi) कडून करण्यात येत आहे.

Updated : 4 July 2023 7:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top