Home > News Update > VIDEO: प्रकाश आंबेडकर तीन महिने सक्रीय राजकारणापासून दूर राहणार...

VIDEO: प्रकाश आंबेडकर तीन महिने सक्रीय राजकारणापासून दूर राहणार...

VIDEO: प्रकाश आंबेडकर तीन महिने सक्रीय राजकारणापासून दूर राहणार...
X

Vanchit Bahujan Aghadiचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर तीन महिने वैयक्तिक कारणामुळे सक्रीय राजकारणापासून अलिप्त राहणार आहेत. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ प्रकाशीत केला आहे. या व्हिडीओ संदेशात त्यांनी आपण पुढील तीन महिने सक्रीय राजकारणापासून अलिप्त असताना पक्षाचा प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांची निवड केल्याचं त्यांनी या व्हिडीओत सांगितलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर यांच्यावर मुंबईतच वैद्यकीय उपचार केले जाणार आहे. हृदयविकारासंबंधित छोटीशी शस्त्रक्रिया त्यांच्यावर केली जाणार आहे. त्यानंतर ते काही दिवस आराम करणार आहेत. वंचित आघाडीचं काम व्यवस्थित सुरू राहावं त्यासाठी त्यांनी व्हिडीओ करून रेखा ठाकूर यांना सहकार्य करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे.


Updated : 8 July 2021 7:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top