Home > News Update > "ज्यांना वाटत असेल हा publicity stunt असेल त्यांनी.."वैशाली माडे यांचा रोख कोणाकडे?

"ज्यांना वाटत असेल हा publicity stunt असेल त्यांनी.."वैशाली माडे यांचा रोख कोणाकडे?

माझ्या हत्येचा कट रचला जातोय अशी फेसबुक पोस्ट केल्यानंतर प्रसिध्द पार्श्वगायिका वैशाली माडे यांनी दुसरी पोस्ट करत पत्रकारांचे आभार मानले आहेत.

ज्यांना वाटत असेल हा publicity stunt असेल त्यांनी..वैशाली माडे यांचा रोख कोणाकडे?
X

सुप्रसिध्द पार्श्वगायिका वैशाली माडे यांनी माझ्या जीवाला धोक आहे, तसेच माझ्या हत्येचा कट रचला जातोय, अशी फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर वैशाली माडे यांनी दुसरी पोस्ट करून ज्यांना पत्रकारांचे आभार मानले आहेत. तर सोबत एका बातमीचा फोटो पोस्ट केला आहे.

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली भैसने माडे यांनी त्यांचा जीवाला धोका असल्याची फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर पोलिसांनी पथक त्यांच्या घरी पोहचले होते. मात्र त्या घरी नसल्याचे समोर आले. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून मुंबईत आल्यानंतर तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले होते. परंतू दरम्यान त्यांनी आणखी एक पोस्ट करत पत्रकारांचे मागील पोस्टची दखल घेतल्याप्रकरणी आभार मानले आहेत. सोबत त्यांनी एका वर्तमानपत्रात आलेल्या बातमीचा फोटो पोस्ट केला आहे.

त्या म्हणतात, " सर्व प्रिय बंधु भगिनीना जय भिम,जय महाराष्ट्र,जय भारत! बांधवानो काही दिवसापुर्वी पासुन काही लोक द्वेष भावनेने माझ्यावर अन्यायी षडयंत्र चालविण्याचा प्रयत्न करीत आसल्याचे माझ्या लक्षात आल्याने काही लोकांकडुन माझ्या जिवीतास धोका आहे, माझ्या हत्येचा कट रचला जातोय म्हणून आणि याबाबद पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्य स्फोट मी करणार अशी पोस्ट मी टाकुन तुम्हा भावंडाकडे मदतीची मागणी ही केली होती आणि यामुळे आपण सर्वानी तत्परतेने दखल घेतल्या बद्दल सगळ्यांचे मनापासून आभार! तुम्हा भावंडाचे माझ्या पाठीशी पाठबळ आसल्याने सगळे घडुन आले आहे,

टीप- ज्यांना वाटत असेल हा publicity stunt असेल त्यांनी ही बातमी वाचा

...धन्यवाद"

त्यांच्या पहिल्या पोस्टवर राज्यभरातून त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स मध्ये पोलिसांकडे मदतीची मागणी केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांचं निर्भया पथक त्यांच्या घरी दाखल झालं होतं परंतु त्या घरी नव्हत्या. वैशाली माडे ना हे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांचे आभार मानत त्या मुंबईबाहेर असल्याने सांगितले आणि मुंबईत आल्यावर रितसर तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी अंधेरी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं.

अंधेरी पोलिसांनी स्पष्टीकरण देत गायिका वैशाली भैसने यांनी लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या आधारे तपास करत असताना त्यांची पोस्ट व्हायरल झाली आणि आम्ही तातडीने निर्भया पथक त्यांच्या घरी पाठवलं असल्याचे सांगितले.

Updated : 20 Feb 2022 1:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top