Home > News Update > राजेश टोपेंनी मानले आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आभार

राजेश टोपेंनी मानले आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आभार

राजेश टोपेंनी मानले आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आभार
X

देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांच लसीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत करून आभार मानले आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या विविध बैठकांमध्ये सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याबद्दल टोपे यांनी आभार मानले आहे.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीक कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर असतात. त्यामुळे बाधीतांमध्ये या वयोगटातील रुग्णांची संख्या देखील जास्त असल्याने त्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण करावे, अशी मागणी सातत्याने केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्याने केलेल्या या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या अंदाजे ५० टक्क्यांपर्यंत असून युवा वर्गाने आता लसीकरणात सक्रीय सहभाग नोंदवून लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून कोरोनाला रोखणे शक्य होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात लसीकरणाला गती देतानाच दररोज आठ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Updated : 21 April 2021 3:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top