Home > News Update > राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला स्थगिती, ज्येष्ठ नागरिकांना देणारं प्राधान्य

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला स्थगिती, ज्येष्ठ नागरिकांना देणारं प्राधान्य

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला स्थगिती, ज्येष्ठ नागरिकांना देणारं प्राधान्य
X

राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात अगोदर ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरविण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

राज्यात आतापर्यंत सुमारे १ कोटी ८४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत मोफत लसीकरण केले जाते.

सध्या राज्यात कोवॅक्सिन लसीचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत आणि ४५ वर्षांवरील सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या (कोवॅक्सिन) प्रतिक्षेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांसाठी हे डोस पुरेसे नसून त्यामुळं १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिनचे २ लाख ७५ हजार डोसेस आणि शिल्लक ३५ हजार डोसेस असे एकूण सुमारे ३ लाख डोसेस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. कोवीशिल्डचे देखील दुसरा डोस सुमारे १६ लाख नागरिकांना द्यायचे आहेत.

महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने सध्या तरी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

20 तारखेनंतर 18 वर्षांवरील लसीकरणाचा निर्णय

२० तारखेनंतर सिरमक़डून लसींचे अधिक डोस उपलब्ध होणार आहेत त्यामुळे त्यानंतर पुढचा निर्णय घेणार असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे.

Updated : 12 May 2021 3:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top