Home > News Update > उत्तराखंड: हिमकडा तुटल्याने धरणाचा बांध फुटला, अनेक लोक वाहून गेल्याची भीती...

उत्तराखंड: हिमकडा तुटल्याने धरणाचा बांध फुटला, अनेक लोक वाहून गेल्याची भीती...

उत्तराखंड: हिमकडा तुटल्याने धरणाचा बांध फुटला, अनेक लोक वाहून गेल्याची भीती...
X

उत्तराखंड च्या जोशीमठ येथे मोठी दुर्घटना घडली आहे. जोशीमठ येथे हिमकडा कोसळला आहे. ऋषी गंगा नदीवर बनत असलेल्या हायड्रो प्रोजेक्टवर हिमकडा कोसळल्याने (Rishiganga Power Project) चा बांध फुटला आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली आहे. या दुर्घटनेत अनेक लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पुरात ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्ट वाहून गेला असून चमोली जिल्हातील तपोवन भागातील रैणी गावात हा प्रोजेक्ट आहे. हिमकडा कोसळल्यानंतर धौलीगंगा नदी च्या पाण्याचा स्तर अचानक वाढला आहे. लोकांना वरच्या भागात पाठवलं जात आहे. अचानक आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर, ऋषिकेश आणि हरिद्वार सहित या परिसरातील भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तराखंड चे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह Trivendra Singh Rawat यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन ट्विट केलं असून खोटे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करु नका. असं आवाहन त्यांनी ट्विटमध्ये केलं आहे.

काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी?

'चामोली जिल्ह्यात ही मोठी दुर्घटना झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाला योग्य ती पावलं उचलण्याच्या संदर्भात निर्देश दिले आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. सरकार सर्व आवश्यक ती पावलं उचलत आहे."

Updated : 7 Feb 2021 8:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top